Lokmat Sakhi >Gardening > फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

How To Use Potato Water For Plants: फक्त १ बटाटा वापरून रोपांसाठी घरच्याघरी खूप दर्जेदार खत तयार करता येतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं..(benefits of giving potato water to plants)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 15:29 IST2025-07-16T15:28:24+5:302025-07-16T15:29:19+5:30

How To Use Potato Water For Plants: फक्त १ बटाटा वापरून रोपांसाठी घरच्याघरी खूप दर्जेदार खत तयार करता येतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं..(benefits of giving potato water to plants)

use of potato as a fertilizer for plants, how to use potato water for plants, benefits of giving potato water to plants  | फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

Highlightsजेवढं पाणी असेल त्याच्या दुप्पट साधं पाणी घालून ते रोपांना द्या. रोपांसाठी ते उत्तम खत ठरेल. 

बागेतल्या रोपांना नेहमीच नुसतं ऊन, पाणी पुरेसं मिळतंय का हे पाहून उपयोग नसतो. त्यामुळे त्यांची वाढ तर होते पण आपल्याला अपेक्षित असतात तसे ते हिरवेगार, टवटवीत होत नाहीत. किंवा त्यांना फुलांचा बहर येत नाही. कारण त्यांना ऊन आणि पाण्याशिवाय इतरही काही पौष्टिक पदार्थांची म्हणजेच खताची गरज असते. आता बागेला नेहमीच विकतचं खत आणून घालावं असं मुळीच नाही. कारण विकतच्या खतापेक्षाही जास्त गुणकारी खत आपल्या घरातच तयार होऊ शकतं. आता हेच पाहा ना बटाटा हा देखील रोपांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी ठरतो. फक्त त्याचा कसा वापर करून घ्यायचा, ते आपल्याला ठाऊक नसतं (benefits of giving potato water to plants). म्हणूनच आता पाहूया बटाट्यामुळे रोपांना कसा फायदा होतो आणि त्यासाठी बटाटा नेमक्या कोणत्या पद्धतीने वापरायचा.(how to use potato water for plants?)

 

बटाट्यामुळे रोपांना कसा फायदा होतो?

१. बटाट्यापासून तयार केलेलं खत किंवा पाणी आपण जेव्हा रोपांना देताे, तेव्हा त्याच्यातून रोपांना भरपूर प्रमाणात खनिजे मिळतात जे रोपांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. 

Veg Paratha : भाज्या न खाणाऱ्या मुलांनाही आवडेल ‘असा’ मिक्स व्हेज पराठा, शाळेच्या डबा होईल फस्त आनंदाने..

२. बटाट्यामधून रोपांना पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमही मिळतं. त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते तसेच फुलं येण्यासाठीही मदत होते.

३. पोटॅशियम रोपांना चांगल्या प्रमाणात मिळालं तर रोपांवर किड, अळ्या पडत नाहीत. रोपं टवटवीत, फ्रेश राहतात.

 

रोपांसाठी बटाट्याचं पाणी कसं तयार करायचं?

रोपांसाठी बटाट्याचं पाणी तयार करणं अगदी सोपं आहे. हा उपाय करण्यासाठी २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे घ्या आणि ते बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

यानंतर बटाट्याचा किस किंवा फोडी एका बादलीमध्ये भरून घ्या आणि त्या व्यवस्थित बुडतील एवढं पाणी बादलीमध्ये टाका. 

आता या बादलीवर झाकण ठेवून ती २ ते ३ दिवस तशीच राहू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि जेवढं पाणी असेल त्याच्या दुप्पट साधं पाणी घालून ते रोपांना द्या. रोपांसाठी ते उत्तम खत ठरेल. 
 

Web Title: use of potato as a fertilizer for plants, how to use potato water for plants, benefits of giving potato water to plants 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.