आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच घरात तुळशीचे छोटे रोप असतेच. तुळशीच्या रोपाला आपल्याकडे धार्मिक आणि औषधी महत्व आहे. आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये लावलेली तुळस हिरवीगार असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, बऱ्याचदा रोपटे लावले की ते लगेच सुकते, त्याची पाने पिवळी पडतात किंवा ते मरून जाते. अशावेळी खूप निराशा येते आणि तुळशीची योग्य काळजी कशी घ्यावी, हा मोठा प्रश्न उभा राहतो. खरंतर, तुळशीचे रोप हे नाजूक असते तसेच या रोपाच्या (homemade fertilizers for tulsi plant) वाढीसाठी योग्य काळजी, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचं संतुलन असणे आवश्यक असते. जर आपण लावलेलं तुळशीचं रोप वारंवार सुकत असेल, तर काळजी करू नका! काही सोपे आणि घरगुती उपाय करुन (how to protect tulsi plant from drying) आपण तुळशीचं रोप पुन्हा ताजे, हिरवेगार आणि बहरलेलं ठेवू शकता(tulsi plant care tips).
गार्डनिंग एक्सपर्ट हार्दिक यांनी २ असे घरगुती पदार्थ संगितले आहेत की, जे प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात. या दोन खास पदार्थांचा वापर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केल्यास तुळशीचे रोप केवळ सुकण्यापासूनच वाचणार नाही, तर वर्षभर हिरवेगार, दाट आणि निरोगी राहील. तुळशीच्या रोपाला पुन्हा जीवनदान देण्यासाठी आणि हिरवेगार व निरोगी ठेवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करता येतील, ते पाहूयात...
तुळशीचे रोप सुकू नये म्हणून नेमकं काय करावं ?
१. चहा पावडर :- तुळशीच्या रोपासाठी चहापावडर (Tea Leaves) एक उत्तम असे खत आहे. चहापत्तीमध्ये असलेले नायट्रोजन (Nitrogen) तुळशीला वेगाने वाढण्यास आणि हिरवेगार राहण्यास मदत करते. नायट्रोजन थेट पानांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या गडद रंगासाठी फायदेशीर ठरते. एक लीटर पाण्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकून एक दिवसासाठी तसेच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक लीटर साधे पाणी आणखी मिसळा. आता हे तयार केलेले द्रावण महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपाच्या मातीमध्ये टाका. हे मिश्रण मातीची आम्लता संतुलित ठेवते, जे तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असते.
उंदीर, झुरळांनाही खाऊ घाला बिस्कीट! करा असा भन्नाट घरगुती उपाय की घर सोडून जातील पळून...
२. हळद :- तुळशीचे रोप अनेकदा बुरशी किंवा लहान कीटकांच्या रोपांवरील वाढीमुळे सुकू लागते. पाने काळी पडणे किंवा आकसणे हे बुरशीजन्य संसर्गाचे संकेत असू शकतात. अशावेळी हळद पावडर एक नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-सेप्टिक म्हणून काम करते. भाजीपासून ते विविध पदार्थांमध्ये वापरली जाणारी हळद आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच असते, त्यामुळे ती विकत घेण्याचीही गरज लागत नाही. एक लीटर साधे पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा हळद पावडर टाकून व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. या स्प्रेने तुळशीच्या रोपाची पाने आणि खोड यावर चांगल्या प्रकारे फवारणी करा. हा स्प्रे कोणत्याही बुरशीजन्य संसर्गाला त्वरित थांबवतो आणि रोपाला निरोगी ठेवतो. याचा वापर तुम्ही दर १५ दिवसांनी करू शकता.
भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय...
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. जर तुळशीचे रोप उंच वाढण्याऐवजी दाट व्हावे असे वाटत असेल, तर तुम्हाला नियमितपणे पिंचिंग करावे लागेल.
२. तुळशीला निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य संतुलन राखा. जास्त पाणी देऊ नका आणि पूर्णपणे सुकूही देऊ नका.
३. वेळोवेळी माती मोकळी करणे, आवश्यक असते. जेणेकरून मुळांना हवा मिळू शकेल आणि ती निरोगी राहतील.