Join us

उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2024 15:52 IST

Gardening Tips For Yellow Leaves: उन्हाळ्यात रोपांची पानं सुकून गळू लागली असतील तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा... (top 3 reasons for leaf burning and getting yellow in summer)

ठळक मुद्देत्यांना पुन्हा खुलविण्यासाठी, हिरवंगार करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा.

उन्हाचा कडाका सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे आपल्यालाही तो जसा सोसायला कठीण जातो आहे, तसंच काहीसं वनस्पतींचं पण असतं. त्यामुळेच तर उन्हाळ्यात आपल्या छोट्याशा बागेतली इवलीशी रोपंही सुकून जातात. बऱ्याचदा तर रोपांची पानं पिवळसर चॉकलेटी रंगाची होतात, सुकतात आणि मग हळूहळू गळून जातात. रोपांची अशी अवस्था झाल्यावर त्यांच्याकडे पाहावत नाही (gardening tips for yellow leaves ). म्हणूनच त्यांना पुन्हा खुलविण्यासाठी, हिरवंगार करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा. (top 3 reasons for leaf burning and getting yellow in summer)

उन्हामुळे रोपं सुकत असतील, पिवळी पडत असतील तर...

 

१. नायट्रोजन आणि पोटॅशियमचं खत द्या

झाडांना पोटॅशियम आणि नायट्रोजन या घटकांची जेव्हा कमतरता निर्माण होते, तेव्हा रोपांची पानं पिवळी पडतात. यासाठी एक घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटी तांदूळ २ ते ३ वेळा धुवून घ्या.

त्वचा सुंदर- ग्लोईंग होण्यासाठी फेसमास्कची निवड परफेक्ट हवी, बघा त्वचेनुसार कसा निवडावा फेसपॅक

आणि त्यानंतर १ लीटर पाण्यात भिजत घाला. त्याच पाण्यात अर्धी वाटी सोयाबिन, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि २० मिली व्हाईट व्हिनेगर घाला. हे पाणी आता उन्हात ठेवून २ ते ३ दिवस फर्मेंट होऊ द्या आणि गाळून घ्या. त्यानंतर हे पाणी पिवळ्या पडलेल्या रोपावर शिंपडा तसेच थोडं त्याच्या मातीतही टाका. काही दिवसांतच रोपांचा पिवळेपणा कमी होईल.

 

२. केळीची सालं

केळीची सालं पाण्यात भिजत घाला. १० ते १२ तासांनंतर ते पाणी गाळून घ्या आणि झाडांना द्या. केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी आणि झाडांना पुन्हा हिरवेगार करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते.

कॉटनची साडी नेसून कान्समध्ये गेलेल्या रत्ना पाठकच्या 'देसी लूक'ने वेधले लक्ष, चाहते म्हणाले.... 

३. कुंडी बदला

जर रोपांच्या मुळांची पुर्णपणे वाढ झालेली असेल आणि ते रोप ज्या कुंडीत आहे, ती कुंडी त्याला आता अपुरी पडू लागली असेल, लहान झाली असेल तरी रोपं पिवळी पडतात. त्यामुळे रोपांची कुंडी बदलून पाहा. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीसमर स्पेशल