कडिपत्ता आपल्याला स्वयंपाकात नेहमीच लागतो. त्यामुळे आपण तो अगदी हौशीने आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये लावतो. पण तरीही बऱ्याचदा असं होतं की कडिपत्त्याची वाढ चांगली होतच नाही. कधी कधी तर तो नुसताच उंच वाढतो. पानांचा पत्ताच नसतो. त्यामुळे काड्या जास्त आणि पानं कमी अशी त्याची अवस्था होऊन जाते (how to make curry leaves plant healthy and bushy?). अशावेळी कडिपत्ता छान बहरावा आणि त्याला भरपूर पानं येऊन तो हिरवागार, टवटवीत राहावा यासाठी काय उपाय करता येऊ शकतो ते पाहूया..(tips for the fast growth of curry leaves plant)
कडिपत्त्याच्या रोपाची चांगली वाढ होण्याासाठी उपाय
१. कडिपत्त्याच्या रोपाची चांगली वाढ व्हावी यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडिपत्त्याच्या काळ्या झालेल्या बिया लागणार आहेत. कडिपत्ता बऱ्याचदा आकाराने लहान असला तरी त्याला सुरुवातीला हिरव्या बिया येतात. त्यानंतर त्या काळ्या होतात.
भाजी, वरणात जास्त पाणी पडून अगदीच ढुळ्ळूक, पांचट झालं? १ ट्रिक- ग्रेव्ही, आमटी होईल घट्ट
अशा काळ्या पडलेल्या बिया गोळा करा आणि त्या एखाद्या लहान कुंडीमध्ये लावा. काही दिवसांत त्याला पानं फुटायला लागतील. आता ही छोटी छोटी रोपं एका मोठ्या कुंडीत लावत चला.. हळूहळू कडिपत्ता अगदी डवरून जाईल.
पावसाळ्यात केस धुतले तरी लगेच चिकट होतात? २ उपाय- शाम्पू न करताही केस होतील सिल्की
२. कडिपत्त्याची चांगली वाढ होऊन तो चांगला डवरून यावा यासाठी त्याची वेळोवेळी छाटणी करणं खूप गरजेचं आहे. यामुळे मग त्यांची उंची खूप वाढत नाही, पण तो आहे त्याच ठिकाणी खूप बहरून येतो.
३. कडिपत्त्याच्या रोपाला आठवड्यातून एकदा अगदी पातळ ताक घाला. त्यातून मिळणारं नायट्रोजन कडिपत्त्यासाठी अगदी उत्तम खत ठरतं.
पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं
४. कडिपत्त्याच्या पानांवर जर कुठे किडा पडलेला दिसला किंवा पांढरी बुरशी आलेली दिसली तर आंबट ताकामध्ये थोडी हळद, लसणाची पेस्ट आणि दालचिनी पावडर घाला. हे पाणी कुंडीतल्या मातीत तसेच संपूर्ण रोपावर शिंपडा. विकतच कोणतंच औषध फवारण्याची गरज पडणार नाही.