'ओवा' हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. आपल्या घरात जर एखादं औषधी, सुगंधी आणि नेहमी उपयोगी पडणारं रोप लावायचं असेल, तर ओव्याचं (Ajwain plant) रोप हा सर्वोत्तम पर्याय आहे. ओव्याची पाने फक्त स्वयंपाकातच नाही, तर अनेक घरगुती औषधी उपचारांसाठी देखील वापरली जातात. ओव्याच्या रोपांची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात(how to grow ajwain plant at home).
ओव्याचं रोप लावायला सोपं, कमी देखभालीचं आणि अतिशय लवकर वाढणारं असतं. शिवाय त्याचा सुगंध मच्छर आणि कीटकांना दूर ठेवतो, त्यामुळे हे रोप घरासाठी दुप्पट फायदेशीर ठरतं. आपण एरवी घरात वेगवेगळ्या प्रकारची औषधी गुणधर्म असणारी रोप आवर्जून लावतोच त्याचप्रमाणे, छोट्याशा कुंडीत ओव्याचे रोप देखील सहज लावता येऊ शकते. घरच्याघरीच ओव्याचं रोप कुंडीत कसं लावायचं, त्याची योग्य काळजी कशी घ्यायची ते पाहूयात(tips and tricks to grow celery).
ओव्याचे रोप कुंडीत लावण्याच्या दोन सोप्या पद्धती...
१. फांदीपासून रोप लावण्याची पद्धत :-
ओव्याच्या झाडाची एक ३-४ इंच लांबीची ताजी फांदी कापा.
तिच्या खालच्या बाजूची पाने काढून टाका आणि पाण्यात २-३ दिवस ठेवा.
मुळं फुटू लागली की ती फांदी कुंडीत लावा.
हलकी, ओलसर माती वापरा आणि रोज थोडं पाणी शिंपडा.
१०-१५ दिवसात फांदीला नवीन पालवी येते.
पाणी घाला-खत घाला, तुळस सुकतेच? मातीत हे २ पदार्थ मिसळा, तुळस होईल डेरेदार-वाढेल जोमानं...
भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय...
२. बियांपासून रोप लावण्याची पद्धत :-
कुंडीतील माती थोडी सैल करा.
त्यावर ओव्याच्या बिया हलक्या हाताने पेरा.
बिया झाकतील इतकीच माती टाका आणि पाणी शिंपडा.
कुंडी अर्धछायेत ठेवा, ८-१० दिवसात बियांची अंकुरणं दिसू लागतील.
३. ओव्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी :-
पाणी: दररोज थोडं पाणी शिंपडा, पण माती ओलसरच राहील याची काळजी घ्या.
सूर्यप्रकाश: ओव्याचं झाड अर्धसूर्यप्रकाशात उत्तम वाढतं. सकाळचा सूर्यप्रकाश सर्वोत्तम.
खत: महिन्यातून एकदा घरचं शेणखत किंवा कंपोस्ट द्या.
छाटणी: रोप खूप वाढल्यावर त्याची हलकी छाटणी करा, त्यामुळे झाड दाट आणि सुंदर वाढतं.
कीड नियंत्रण: ओव्याच्या पानांवर फारशा किडी येत नाहीत, पण आल्यास कडुलिंबाच पाणी फवारावं.
Web Summary : Ajwain, a useful herb, is easy to grow at home. Plant from cuttings or seeds in pots. Water moderately, provide partial sunlight, and use organic fertilizer. Regular pruning ensures healthy growth. Enjoy ajwain tea and fritters from your home-grown plant.
Web Summary : अजवाइन, एक उपयोगी जड़ी बूटी, घर पर उगाना आसान है। कटिंग या बीज से गमलों में लगाएं। मध्यम रूप से पानी दें, आंशिक धूप प्रदान करें और जैविक खाद का उपयोग करें। नियमित रूप से छंटाई करने से स्वस्थ विकास सुनिश्चित होता है। अपने घर के उगाए पौधे से अजवाइन की चाय और भजिये का आनंद लें।