Join us

लिंबाच्या रोपाला फक्त पानंच? कुडींत चमचाभर 'हा' पदार्थ घाला, टपोऱ्या लिंबांनी बहरेल रोप....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:14 IST

Tips And Tricks Kitchen Garden Tips : लिंबू कुंडीत किंवा गार्डनमध्ये कुठेही तुम्हाला लावता येतील. घरच्याघरी तुम्ही सोप्या पद्धतीनं लिंबाचं झाडं लावू शकता.

लिंबाला (Lemon) बाजारात वर्षभर मागणी असते.  लिंबाचा वापर तुम्ही सॅलेड किंवा इतर पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी करू शकता. बाजारात टपोरी, पिवळी लिंब दिसतात तसेच लिंबू कुंडीत किंवा गार्डनमध्ये कुठेही तुम्हाला लावता येतील. घरच्याघरी तुम्ही सोप्या पद्धतीनं लिंबाचं झाडं लावू शकता. (Tips And Tricks Kitchen Garden Tips Put 1 Spoon Of This Fertilizer On Root Of Lemon Plant)

काही लोक किचन गार्डनमध्ये लिंबाचं रोप लावतात. अनेकदा लिंबाच्या झाडाची काळजी घेऊनही या रोपाला लिंबू येत नाहीत. फक्त १ उपाय करून तुम्ही लिंबू  चांगले वाढवू शकता. जानेवारी महिन्यात लिंबाच्या रोपाची वाढ थांबते. फळं येणं बंद होतं. पण जर तुम्ही जैविक उत्पादन बायोएजाईम्सचा वापर केला तर लिंबाला चांगली फळं येतील.

बायोएन्जाईम एक प्राकृतिक उत्पादन आहे. बायोएन्जाईम्स लिंबाच्या रोपात घातल्यानं फळं आणि फुलं दोन्ही खूप चांगली येतात. रोपाचा विकास वेगानं होतो. बायोएन्जाईम्समध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स एस्कोफिलम नोडोसम, व्हिटामीन्स यांसारखी तत्व असतात.  ज्यामुळे लिंबाचा आकार वाढतो. लिंबाच्या रोपात तुम्ही बायोएन्जाईम्सचा वापर करायला हवा.

लिंबाच्या रोपात बायोएन्जाईम्स घालण्यासाठी १ लिटर ताजं पाणी घ्या. त्यात १ चमचा बायोएन्जाईम्स घालून व्यवस्थित मिसळा. नंतर लिंबाचे रोप मुळापासून खोदून त्यात तयार लिक्विड फर्टिलायजर घाला. हे लिक्विड फर्टिलायजर एका महिन्यात एकदा वापरा. ज्यामुळे लिंबाच्या रोपाला भरपूर फळं येतील.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स