आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात किंवा गार्डनमध्ये किमान एक तरी छोटंसं कोरफडीच रोप असतंच. 'कोरफड' हे केवळ एक रोप नसून आरोग्याचा आणि सौंदर्याचा खजिना आहे. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत हिरवीगार, टवटवीत कोरफड लावलेली असली की घराची शोभा वाढते. आपण अनेकदा मोठ्या हौसेने कुंडीत कोरफडीचं रोप लावतो खरं, परंतु कुंडीत रोप लावताच अनेकांच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरु होतात. 'कोरफड वाढतच नाहीये' किंवा 'पाने पातळ झाली असून त्यात अजिबात गर नाही'. अनेकदा पाने पिवळी किंवा तपकिरी पडू लागतात. इतकेच नाही तर कित्येकदा रोपाची योग्य ती काळजी घेऊन देखील त्याची पाहिजे तशी वाढ होत नाही(tips and tricks for aloe vera plant fast growth).
कोरफडीचे रोप लावायला सर्वात सोपे असते असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात अनेकांच्या घरात ही कोरफड सुकताना दिसते. तुम्ही तिला रोज पाणी घालता, खूप काळजी घेता, तरीही तुमची कोरफड का वाढत नाहीये? जर तुमची कोरफडही केवळ नावापुरतीच कुंडीत जिवंत असेल तर, वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन कोरफडीच्या रोपाची काळजी घेतल्यास रोप पुन्हा नव्यासारखे टवटवीत, हिरवेगार होते. कोरफडीची पाने जाड, रसाळ आणि हिरवीगार असणे हे त्या रोपाच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण असते. कोरफडीच्या वाढीसाठी केवळ पाणी आणि माती पुरेशी नसते, तर रोपाची काळजी घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर तुमच्या कोरफडीच्या (how to grow aloe vera faster at home) पानात गर नसेल आणि वाढ खुंटली असेल, तर कोणत्या (aloe vera plant fast growth hacks) लहान - सहान चुका करत आहात आणि त्या कशा सुधारायच्या ते पाहूयात.
कोरफडीच्या रोपाची अशी घ्या काळजी...
१. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा :- इतर घरगुती रोपांच्या तुलनेत कोरफडीला (Aloe Vera) खूप जास्त पाणी देण्याची गरज नसते. हे रोप कॅक्टस प्रजातीतील असल्याने ते पाण्याशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकते. त्यामुळे कोरफडीला पाणी घालताना प्रमाणाचे भान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरफडीला पाणी देण्यापूर्वी नेहमी कुंडीतील माती आपल्या बोटांनी स्पर्श करून तपासा. जर मातीमध्ये थोडासाही ओलावा किंवा ओलसरपणा जाणवत असेल, तर पाणी घालू नका. जोपर्यंत कुंडीतील माती पूर्णपणे कोरडी होत नाही, तोपर्यंत पुन्हा पाणी देऊ नका. जेव्हा तुम्ही माती कोरडी झाल्यावर पाणी देता, तेव्हा रोपाची मुळे अधिक मजबूत होतात आणि पानांमध्ये नैसर्गिकरीत्या जाड गर भरण्यास मदत होते.
विराट कोहलीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितल्या ५ गोष्टी, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे उपाय...
२. पुरेसा सूर्यप्रकाश द्या :- अनेकजण कोरफडीचे रोप 'इनडोअर प्लांट' म्हणून घराच्या आत ठेवतात. मात्र, कोरफडीची वाढ वेगाने व्हावी असे वाटत असेल, तर त्याला सूर्यप्रकाशात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोरफडीच्या रोपाला दररोज किमान ४ ते ५ तास ऊन मिळेल याची काळजी घ्या. योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे रोपाला नवीन पाने लवकर येतात आणि जुन्या पानांचा ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो. इतकेच नाही तर, उन्हामुळे कोरफडीचे रोप लवकरच दाट आणि डेरेदार होते.
३. कुंडीतील माती हवेशीर ठेवा :- जर तुम्ही कोरफड कुंडीत लावत असाल, तर माती तयार करताना ती हवेशीर असेल याची विशेष काळजी घ्या. घट्ट मातीमुळे मुळांना श्वास घेता येत नाही आणि रोपाची वाढ थांबते. कोरफडीसाठी माती तयार करताना साध्या मातीमध्ये थोडी वाळू (Sand) नक्की मिसळा. वाळूमुळे माती भुसभुशीत राहते, ज्यामुळे जास्तीचे पाणी निचरा होऊन बाहेर पडते आणि मुळे सडत नाहीत. मातीतील ओलावा योग्य प्रमाणात टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्यात कोकोपीट (Cocopeat) देखील मिसळू शकता. लक्षात ठेवा की, कुंडीमध्ये वरपर्यंत काठोकाठ माती भरू नका. कुंडीत थोडी रिकामी जागा ठेवल्याने हवा खेळती राहते आणि पाणी टाकणेही सोपे जाते.
तमन्ना भाटियाच्या मिल्की त्वचेचा 'देसी' फॉर्म्युला! स्वयंपाकघरातील ३ पदार्थ देतात ५ मिनिटांत ग्लो...
४. लहान रोपे वेगळी करा :- मुख्य कोरफडीच्या रोपाच्या बाजूला लहान-लहान छोटी रोपं येतात. ही लहान रोप मुख्य मोठ्या रोपाचे सर्व पोषण शोषून घेतात, ज्यामुळे मुख्य रोपाची वाढ थांबते. ही लहान रोपे काळजीपूर्वक काढून दुसऱ्या कुंडीत लावा. यामुळे मुख्य रोपाला वाढायला पुरेशी जागा आणि पोषण मिळेल.
५. पानांमध्ये गर भरण्यासाठी खत वापरा :- पानांमध्ये गर कमी असणे म्हणजे रोपाला पुरेसे पोषण मिळत नाही आहे. घरगुती उपाय म्हणून वाळलेल्या चहा पावडरचा वापर करा (साखर नसलेली चहा पावडर धुवून वाळवा). महिन्यातून एकदा थोडी चहा पावडर किंवा शेणखत मातीत मिसळा. यामुळे रोपाला नायट्रोजन मिळते आणि पाने जाड होतात आणि पानांतील गराचे प्रमाणही वाढते.
Web Summary : Transform struggling aloe vera with proper watering, ample sunlight, and well-draining soil. Remove small offshoots to boost growth. Fertilize with tea powder for thicker, gel-filled leaves. These steps will revitalize your plant in weeks.
Web Summary : उचित पानी, पर्याप्त धूप और अच्छी जल निकासी वाली मिट्टी से एलोवेरा को बदलें। विकास को बढ़ावा देने के लिए छोटे अंकुरों को हटा दें। मोटे, जेल से भरे पत्तों के लिए चाय पाउडर से खाद डालें। इन कदमों से आपका पौधा हफ्तों में फिर से जीवंत हो जाएगा।