गार्डनिंग करताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये रोप, झाडं लावल्यावर त्यांची तितकीच विशेष देखभाल देखील करावी लागतेच. सध्या उन्हाळ्याचा (tea powder & lemon peel water for plants) ऋतू सुरु आहे. उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे रोपं सुकतात, कोमेजून जातात. इतकेच नाही तर रणरणत्या उन्हामुळे रोपांना काहीवेळा फळं - फुल येणंच बंद होत. एरवी वर्षभर फळाफुलांनी लगडलेल्या रोपांना (How to make best liquid fertilizer with the Use of Lemon peels & tea powder) अचानकपणे फळं - फुल येणं बंद झालं की आपला देखील हिरमोड होतोच. अशावेळी आपण रोपांना वेगवेगळ्या प्रकारची खतं, औषधी फवारण्या करतोच परंतु काहीवेळा त्यांचा देखील काहीच उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत, आपण या रोपांसाठी काही साधेसोपे घरगुती उपाय देखील घरच्याघरीच करून पाहू शकतो(Lemon Peel & Tea Powder Best Homemade Fertilizer).
उन्हाळ्यात रोपांची विशेष काळजी घेताना, अचानकपणे फळं - फुलं येणं बंद झालं तर किचनमधील दोन पदार्थ ठरतील फायदेशीर. किचनमधील काही पदार्थ हे आपल्या नेहमीच्या वापरातील असतात, या पदार्थांच्या मदतीने आपण उन्हाळ्यात रोपांसाठी एक खास प्रकारचे पाणी तयार करून रोपांच्या मुळाशी घालू शकतो. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात.
उन्हाळ्यात रोपांना अचानकपणे फळं - फुलं येणं बंद झालं...
उन्हाळ्यात रोपांना अचानकपणे फळं - फुलं येणं बंद झालं तर आपण एक घरगुती उपाय नक्की करू शकतो. यासाठी स्वयंपाकघरातील नेहमीच्या वापरातील लिंबाच्या साली आणि चहा पावडर हे दोनच पदार्थ लागणार आहेत. उन्हाळ्यात रोपांना अचानकपणे फळं - फुलं येणं बंद झालं तर नेमकं काय करायचं यासाठीचा सोपा घरगुती उपाय r_vgarden या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...
मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...
या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, एका भांड्यात ५ ते ८ लिंबाच्या साली घ्याव्यात. लिंबू पिळून त्यातील रस काढून झाल्यावर साली फेकून न देता आपण याच सालींचा वापर करू शकतो. त्यानंतर याच भांड्यात १ ते २ टेबलस्पून चहा पावडर घालावी. आता या मिश्रणात पाणी घालून हे मिश्रण हलवून झाकून ठेवून द्यावे. संपूर्ण एक दिवस हे मिश्रण असेच झाकून ठेवावे. त्यानंतर एका मोठ्या बाटलीत हे तयार द्रावण गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. जर एक मगभरून आपण हे द्रावण घेतलं तर त्यात ५ ते ६ मग पाणी घालावे, हेच प्रमाण ठेवून द्रावण तयार करून घ्यावे.
तयार झालेल द्रावण महिन्यातून एकदा रोपांच्या कुंडीतील मातीत घालावं. यामुळे सुकलेली, कोमेजलेली रोप पुन्हा पहिल्यासारखी ताजीतवानी होतात. इतकेच नाही तर रोपांना अचानकपणे फळं - फुलं येणं बंद झालं असेल तर, रोप पुन्हा एकदा फळाफुलांनी बहरुन जातील.