Lokmat Sakhi >Gardening > फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही

फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही

Best Fertilizer For Kadipatta Plant: कडिपत्त्याचं रोप अजिबातच वाढत नसेल तर त्यासाठी काय करावं यासाठी अगदी साध्या सोप्या २ गोष्टी..(home hacks for the fast growth of curry leaves plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 15:43 IST2025-04-28T15:42:54+5:302025-04-28T15:43:41+5:30

Best Fertilizer For Kadipatta Plant: कडिपत्त्याचं रोप अजिबातच वाढत नसेल तर त्यासाठी काय करावं यासाठी अगदी साध्या सोप्या २ गोष्टी..(home hacks for the fast growth of curry leaves plant)

simple gardening tips for kadipatta plant, home hacks for the fast growth of curry leaves plant, best fertilizer for kadipatta plant | फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही

फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही

Highlightsकडिपत्त्याचं रोप आवर्जून लावतो. पण तो चांगला वाढत नाही. त्याला पानं कमी आणि काड्याच जास्त दिसतात..

कडिपत्त्याचं रोप अनेकजण अगदी हौशीने आपल्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये लावतात. जेणेकरून ताजा ताजा कडिपत्ता नेहमीच स्वयंपाकात वापरता येईल. कारण कोणत्याही पदार्थाला जेव्हा आपण कडिपत्त्याची फोडणी देतो तेव्हा त्याची चव जास्त खुलून येते. शिवाय कडिपत्ता औषधीही असतोच. त्यामुळे तो नियमितपणे आपल्या आहारात असावा असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. कडिपत्त्यामुळे त्वचेला आणि केसांना होणारे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. म्हणूनच आपण कडिपत्त्याचं रोप आवर्जून लावतो. पण तो चांगला वाढत नाही. त्याला पानं कमी आणि काड्याच जास्त दिसतात (simple gardening tips for kadipatta plant). किंवा पानं आली तरी ती खूप नाजुक, पिवळी, वाळलेली असतात. शिवाय तो अजिबातच हिरवागार, छान फुललेला नसते (Best Fertilizer For Kadipatta Plant). असं सगळं तुमच्याही कडिपत्त्याच्या रोपाच्या बाबतीत होत असेल तर त्यासाठी काय उपाय करायचा ते पाहा..(home hacks for the fast growth of curry leaves plant)

 

कडिपत्त्याच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी घरगुती उपाय

कडिपत्त्याच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ gardenofkavita या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

कपाळ काळे, गाल गोरे असे चेहऱ्यावर पॅचेस दिसतात? 'हा' लेप लावा- वांगाचे डागही जातील

१. ताक

ताक हे कडिपत्त्यासाठी एखाद्या टॉनिकसारखं आहे. कारण ताकामध्ये असणारे घटक कडिपत्त्याच्या चांगल्या वाढीसाठी मदत करतात. शिवाय जर रोपावर काही रोग पडला असेल तर त्यासाठीही एखाद्या औषधाप्रमाणे ताकाचा उपयोग होतो. त्यामुळे १५ दिवसांतून एकदा कडिपत्त्याच्या रोपाला ताक घाला. ताक आणि पाणी १: ३ या प्रमाणात एकत्र करून रोपाला द्यावे आणि थोडे पानांवरही शिंपडावे. खराब झालेले, चवीला कडवट असणारे ताक रोपाला घालू नये. 

 

२. गांडूळ खत

ताकाप्रमाणेच कडिपत्त्याच्या रोपाला ठराविक दिवसांनी गांडूळ खत सुद्धा आठवणीने घालावे. कारण यामुळे रोपाची चांगली वाढ होते आणि ते हिरवेगार होते.

पोट सुटत चाललंय, पण व्यायामाला वेळच नाही? फक्त ३ मिनिटांचे ३ व्यायाम- पोट होईल सपाट...

महिन्यातून एकदा कुंडीतली माती थोडी थोडी उकरावी आणि त्या मातीमध्ये गांडूळखत घालावे. शिवाय कडिपत्त्याची नेहमीच कटिंग करत राहावी. यामुळे त्यांना जास्त फांद्या फुटून ते अधिक डेरेदार होण्यास मदत होते. 


 

Web Title: simple gardening tips for kadipatta plant, home hacks for the fast growth of curry leaves plant, best fertilizer for kadipatta plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.