प्रत्येक सणावाराला किंवा धार्मिक कार्यात महत्वाच्या असलेल्या विड्याच्या पानांचा वेल हमखास बऱ्याचजणांकडे लावतात. नागवेलीचा वेल घराच्या अंगणात किंवा कुंडीत लावलेला असेल तर त्याची हिरवागार पानं आणि भरपूर वाढलेली वेल घराचे सौंदर्य अधिक वाढवतात. आपण मोठ्या हौसेन ही नागवेलीची वेल आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा कुंडीत लावतो. यासोबतच वेलीची योग्य देखभाल देखील करतो, परंतु बऱ्याचजणांची तक्रार असते की, नागवेलीची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात किंवा त्यांचा अपेक्षित हिरवागार रंग येत नाही(secret trick to increase the growth of betel leaf plant).
जर तुमच्याही नागवेलीला भरपूर आणि टवटवीत पाने येत नसतील, तर आता काळजी करू नका! कारण केवळ धार्मिक विधींसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असलेल्या या वेलीची वाढ व्यवस्थित व्हावी, वेलीला भरपूर मोठी आणि हिरवीगार पाने यावीत यासाठी बाजारातील रासायनिक खतांपेक्षा एक साधासोपा (home remedy for betel leaf growth) आणि परिणामकारक 'घरगुती उपाय' खूपच फायदेशीर ठरतो. घरात सहज उपलब्ध असलेले 'तांदळाचे पाणी' हेच तुमच्या नागवेलीसाठी 'संजीवनी' ठरू शकते. गार्डनिंग एक्सपर्ट कविता जोशी यांनी नागवेलीच्या रोपाला हिरवेगार (rice water benefits for betel leaf plant) आणि जंगलासारखे दाट बनवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचे टॉनिक फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. स्वयंपाक करताना वाया जाणारे तांदळाचे पाणी नागवेलीसाठी 'सुपरफूड' म्हणून काम करते. तांदळाचे पाणी नागवेलीसाठी कसे फायदेशीर आणि ते वापरण्याची पद्धत कोणती, ज्यामुळे वेलीची वाढ जोमाने होईल आणि पाने अधिक हिरवीगार दिसतील, याची सोपी पण भन्नाट ट्रिक पाहूयात...
'सुपरफूड टॉनिक' आहे तांदळाचे पाणी :-
'नागवेल' ही एक नाजूक वेल आहे, ज्याला सतत पोषणाची गरज असते. जे तांदळाचे पाणी आपण फेकून देता, ते या रोपासाठी 'सुपरफूड' आहे. तांदळाच्या पाण्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते, जे मातीतील सूक्ष्म जीवांना वाढवण्याचे काम करते. यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे असतात. हे पोषक घटक मातीची सुपीकता वाढवतात, ज्यामुळे मुळांना पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत मिळते. वेलीच्या हिरव्यागार वाढीसाठी नायट्रोजन सर्वात महत्त्वाचे असते, ज्यामुळे पाने मोठी आणि चमकदार बनतात आणि वेल वेगाने वाढून घनदाट होतो.
कबुतरांचा कलकलाट आणि विष्ठेने हैराण? कुंडीत लावा 'हे' रोप - कबुतर गॅलरीत फिरकणार नाहीत...
तांदळाचे पाणी नेमके कसे तयार करावे ?
नागवेलीच्या रोपासाठी तांदळाचे पाणी दोन वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जाऊ शकते. पहिली पद्धत म्हणजे जेव्हा आपण भात तयार करण्यापूर्वी तांदुळ स्वच्छ धुतो, तेव्हा ते पाणी गाळून एका वाटीत किंवा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा. हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि हे पाणी लगेच वापरण्यासाठी तयार होते.
दुसऱ्या पद्धतीत, भात शिजवताना जे पाणी उकळून बाहेर येते, ज्याला 'माड' म्हणतात. ते पाणी देखील खूप फायदेशीर असते, माड एका भांड्यात काढून घ्या. या पाण्यांत स्टार्च असल्याने ते अधिक घट्ट व दाटसर असते, त्यामुळे ते थेट वापरण्यापूर्वी थंड करणे आणि सम प्रमाणात पाणी घालून पातळ करणे आवश्यक असते. जेवढा माड तेवढेच पाणी असे एकसमान मिश्रण तयार करावे, आता हे पाणी नागवेलीच्या मुळांजवळ ओतावे.
तांदूळ धुतलेले पाणी किंवा पातळ केलेला माड एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्यप्रकाश तीव्र नसेल, तेव्हा पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूला चांगल्या प्रकारे फवारणी करा. यामुळे रोपाला थेट पोषण मिळेल आणि पाने चमकदार होतील.
तांदळाच्या पाण्यासोबतच नागवेलीला दाट आणि निरोगी ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे देखील गरजेचे असते. रोपाला थेट कडक उन्हापासून वाचवून सावलीच्या ठिकाणी ठेवा, जिथे पुरेशी नैसर्गिक हवा आणि प्रकाश असेल. कुंडीतील मातीत पाण्याचा जमाव होऊ देऊ नये. माती पूर्णपणे सुकल्यावरच पाणी द्यावे. वेळोवेळी वेलीची हलकीशी छाटणी करत रहा, छाटणीमुळे वेलीला नवीन फांद्या फुटतात, ज्यामुळे वेल आणखी दाट होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेलीला आधार द्यायला विसरू नका. कोणत्याही लाकडी काठीचा किंवा दोरीचा आधार द्या, जेणेकरून त्याची वाढ योग्य दिशेने होऊ शकेल.