'लसूण' हा आपल्या रोजच्या जेवणात हमखास प्रत्येक घरोघरी वापरलाच जातो. डाळीपासून भाजी, आमटीला फोडणी द्यायची म्हटलं तर लसूण हवाच, पण सध्या बाजारात लसूण खूपच महाग विकला जातो. परंतु रोजच्या जेवणात वापरला जाणारा लसूण महाग किमतीत विकत घेण्यापेक्षा आपण तो घरच्याघरीच सहज एका छोट्या कुंडीत उगवू शकतो. लसूण घराच्या टेरेसवर किंवा बागेत उगवणे इतके सोपे आहे की, यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही(Secret Tips to Grow Garlic at Home).
आपण घरच्याघरीच एक सोपी पद्धत वापरुन छोट्याशा कुंडीतही लसूण लावू शकतो, यामुळे आपल्याला रोज ताज्या लसूण पाकळ्या मिळणे सहज शक्य होते. 'दादी माँ की बगिया' या यूट्यूब चॅनेलच्या गार्डनिंग एक्सपर्टने एक अशी नैसर्गिक आणि सोपी पद्धत सांगितली आहे, ज्यामुळे आपण किचनमधील टाकाऊ कचऱ्याचा वापर करून एका पोत्यात मोठ्या प्रमाणात लसूण (how to grow garlic at home) उगवू शकतो. घरच्याघरीच सहज पद्धतीने लसूण कशी उगवावी (easy way to grow garlic at home) याची सोपी पद्धत पाहूयात.
घरच्याघरीच लसूण उगवण्याची सोपी आणि खिशाला परवडेल अशी ट्रिक...
लसूण उगवण्यासाठी रुंद कुंडीची गरज असते. जर तुमच्याकडे कुंडी नसेल, तर 'दादी माँ की बगिया' या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, सामान आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पोत्यांचा देखील उपयोग करू शकता. पोत्याला दुमडून किंवा फोल्ड करून एका ग्रो-बॅगचा (Grow Bag) आकार द्या. आता पोत्याच्या खालच्या भागात तळाशी सर्वात आधी किचन मधील टाकाऊ पदार्थ म्हणजेच फळ आणि भाज्यांच्या सालं आणि सुखलेली पाने भरा. हा कचरा हळूहळू खत बनेल आणि लसणाच्या रोपाला पोषण देईल.
कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...
लसूण चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी माती भुसभुशीत असणे खूप गरजेचे असते, जेणेकरून यात पाणी साचणार नाही. स्वयंपाकघरातील टाकाऊ कचरा टाकल्यानंतर, सुकलेल्या पानांचे खत, सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्यांचा चुरा आणि मातीचे मिश्रण घाला. या मिश्रणात वाळू किंवा रेती मिसळलेली माती नक्की टाकावी. वाळूमुळे माती सैल आणि भुसभुशीत बनते, ज्यामुळे पाणी साचत नाही आणि लसणाच्या रोपाला व्यवस्थित पसरायला जागा मिळते.
महिनाभर टिकणारी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी ८ टिप्स, टिकते छान-विकत आणायची गरजच नाही...
लसणाच्या पाकळ्यांचा बियाण्यासारखा वापर करण्यासाठी, त्यांना योग्य प्रकारे तयार करणे खूप महत्त्वाचे असते. लसणाची संपूर्ण गाठ फोडून तिच्या सर्व पाकळ्या वेगवेगळ्या करा. या पाकळ्या अजिबात सोलायच्या नाहीत. तसेच, पाकळीचा खालील मूळ आधार तसाच सुरक्षित राहायला हवा. फक्त २ ते ३ लसणाच्या गाठी लावल्यास, तुम्हाला एक किलोपेक्षा जास्त लसणाचे उत्पादन मिळू शकते.
पाकळीचा गाठ असलेला भाग (ज्या बाजूने मुळे/मुळे निघणार आहेत) हा मातीच्या खाली (खालीच्या दिशेने) राहायला हवा. पाकळीचा अणकुचीदार भाग हा वरच्या दिशेने राहायला हवा आणि तो मातीतून हलकासा बाहेर दिसला पाहिजे. पाकळ्या एकमेकांपासून किंचित अंतरावर लावा, जेणेकरून त्या जेव्हा गाठीच्या रूपात फुगतील तेव्हा त्यांना पुरेशी जागा मिळेल. पाकळ्या लावून झाल्यावर, त्यावर थोडी आणखी भुरभुरीत माती घाला आणि हलक्या हाताने दाबून माती सेट करा.
लसूण वाढवण्यासाठी त्याला खूप जास्त सूर्यप्रकाश किंवा सतत खत घालण्याची गरज नसते. फक्त मातीमध्ये हलका ओलावा टिकून राहिला पाहिजे. माती जास्त ओली नसावी, तर फक्त हलकीशी ओलसर असावी, याची काळजी घ्या. सर्व सामग्री टाकल्यानंतर, एकदा भरपूर पाणी घाला. असे केल्याने माती जेवढी खाली बसायची आहे, तेवढी बसेल आणि लसूण लावल्यानंतर मातीचा थर बिघडणार नाही.
लसणामध्ये नैसर्गिकरित्या कीटकनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे त्यावर बाहेरून कीटकांचा हल्ला कमी होतो आणि बुरशीचा धोका देखील कमी असतो. काही आठवड्यांमध्येच लसणाचे हिरवेगार कोंब मातीतून वर दिसू लागतील. जेव्हा लसणाच्या रोपाची पाने पिवळी पडू लागतील आणि सुकून जातील, तेव्हा लसूण काढणीची वेळ झाली आहे, अशावेळी तुम्ही लसूण मातीतून बाहेर काढू शकता.