आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात कोरफडीचे एक छोटे रोप असते. आपण मोठ्या हौसेन हे रोप लावतो. सध्या एलोवेरा जेल केस आणि त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासोबतच, अनेक आजारांवर उपचार म्हणून देखील वापरले जाते. कोरफडीच्या पानांमध्ये असणारा पारदर्शक गर बहुगुणी व औषधी असून तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. परंतु बरेचदा अनेकजण तक्रार करतात की, कोरफडीचे रोप लावूनही त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, पाने सुकतात, रोप कोमेजून जाते पानात अपेक्षित एलोवेरा जेल तयार होत नाही. हा अनुभव कित्येकांना निराश करतो... अनेकदा या रोपाची योग्य ती काळजी घेऊन देखील वेगवेगळ्या समस्या येतात(Secret booster to increase aloe vera plant growth faster & maximize gel production).
या समस्येवर उपाय म्हणजे, आपण घरच्याघरीच फुकटात मिळणाऱ्या काही पदार्थांच्या मद्तीने रोपाच्या वाढीस मदत करु शकतो, इतकेच नाही तर या घरगुती उपायांमुळे कोरफडीच्या ( aloe vera plant growth tips) पानांतील जेलचे प्रमाण दुपटीने वाढवू शकतो. याव्यतिरिक्त, अशा काही कॉमन ४ चुका देखील सांगितल्या आहेत, ज्या आपण वारंवार करतो आणि म्हणूनच रोप मरून जाते किंवा पानांमध्ये जेल तयार होत नाही. कोरफडीच्या पानांतील जेलचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि रोपाची चांगली वाढ (increase aloe vera gel production). होण्यासाठी नेमकं काय करायचं, कोणत्या चुका टाळायच्या ते पाहूयात...
कोरफडीच्या रोपासाठी नैसर्गिक घरगुती खत...
१. कोरफडीच्या पानांतील जेलचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि रोपाची चांगली वाढ होण्यासाठी, लसूण पाकळ्यांच्या सालीचे लिक्विड फर्टिलायझर सर्वात उपयुक्त ठरते. फक्त लसणाच्या साली पाण्यात भिजवून, त्याचे लिक्विड गाळून महिन्यातून एकदा कुंडीतील मातीत ओतावे. याव्यतिरिक्त, चहा गाळून उरलेली चहा पावडर महिन्यातून एकदा एक चमचा टाकू शकता. तुम्ही हवे असल्यास, कॉफी पावडर आणि हळदी पावडर एकत्र पाण्यात मिसळून देखील रोपाला देऊ शकता.
२. रोपाला पोषण देण्याची वेळ आणि पाणी देण्याची वेळ यांत योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. लिक्विड फर्टिलायझर पूर्णपणे सुकल्यानंतरच रोपाला पुन्हा पाणी द्यावे. हळदी पावडरचा वापर दर १५ दिवसांनी करू शकता. हळद हे एक अँटी-फंगल एजंट आहे, जे रोपाला वेगवेगळ्या रोगांपासून वाचवते.
कोरफडीच्या रोपाची काळजी घेताना 'या' चुका टाळा...
चूक १ :-रोपाची योग्य वेळी छटाई न करणे :- कोरफडीच्या रोपाला दाट आणि निरोगी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की, त्याची वेळोवेळी छटाई करत राहावी. जेव्हा आपण जुनी पाने काढून टाकतो, तेव्हा रोपाची सगळी ऊर्जा नवीन पाने बनवण्यात खर्च होते. याच नवीन पानांमध्ये जेलचे प्रमाण जास्त असते आणि पाने देखील जाड असतात. याउलट, जुनी पाने फक्त जागा व्यपण्याचे काम करतात. त्यामुळे, रोपाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी जुनी पाने काढत राहायला हवे.
चूक २ :- गरजेपेक्षा जास्त पाणी देणे :- ओल्या मातीमुळे कोरफडीची मुळे कमकुवत होतात. कुंडीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेसा छेद नसणे किंवा पाणी साचून राहणे यामुळे बुरशी तयार होते, परिणामी मुळे सडून जातात.
चूक ३ :- पुरेसे पाणी न देणे :- पाने बारीक होणे हे पुरेसे पाणी न मिळाल्याचे संकेत आहे. कोरफड पाणी आपल्या पानांमध्ये साठवून ठेवते, त्यामुळे जेव्हा माती पूर्णपणे सुकते, तेव्हाच रोपाला भरपूर पाणी द्यावे.
चूक ४ :- पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे :- कोरफड हे एक वाळवंटीय रोप आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, त्याला दिवसभर कडक आणि तीव्र सूर्यप्रकाश आवश्यक आहे. जास्त ऊन किंवा अंधार यांपैकी काहीही कोरफडीसाठी योग्य नाही. जास्त उन्हामुळे पानांमधील पाणी सुकून जाते, तर अंधारात ते प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे, रोपाला अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि सूर्यप्रकाश मिळेल, पण दुपारच्या तीव्र, थेट उन्हापासून त्याचे संरक्षण करावे.