Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे कोमजलेलं रोप पुन्हा होईल ताजं-टवटववीत; ही पांढरी वस्तू कुंडीत मिसळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 21:14 IST

Secret To Revive Withered And Dried Plant At Home : तांदूळ केसांच्या मुळांना पोषण देतात. बेकींग सोडा, व्हिनेगर  मातीला हानीकारक तत्वांपासून वाचवतात.  

बाल्कनीतील तुमचं आवडतं रोप कोमेजू लागलं तर स्वंयपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही रोपं पुन्हा खुलवू शकता. आरव्ही गार्डनर एक्सपर्ट्सनी एक स्वस्त आणि असरदार उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला १ लिटर पाणी, १ मूठभर तांदूळ, १ चमचा बेकींग सोडा आणि काही थेंब व्हिनेगर लागेल. (Gardening Tips)

 तांदूळ केसांच्या मुळांना पोषण देतात. बेकींग सोडा, व्हिनेगर  मातीला हानीकारक तत्वांपासून वाचवतात.  हे  मिश्रण योग्य पद्धतीनं वापरल्यास तुम्हाला बरेच फायदे मिळतील. हा एक स्वस्त उपाय असून तुम्ही नक्की करून पाहायला हवा. (RV Garden Experts Shard Secret To Revive Withered And Dried Plant At Home By Using Baking Soda And Vinegar)

बेकींग सोड्याचं हे द्रावण कसं तयार करायचं?

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी १ लिटर  स्वच्छ पाणी घ्या. यात एक मूठ कच्चे तांदूळ घाला थोड्यावेळासाठी तसंच ठेवा. नंतर यात १ चमचा बेकींग सोडा मिसळा. नंतर यात ४ ते ५ थेंब व्हाईट व्हिनेगर घाला. हे मिश्रण गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.

हे द्रावण वापरण्याची योग्य पद्धत

 आरव्ही गार्डनर एक्सपर्ट्स सांगतात की हे मिश्रण रोपासांसाठी वापरणं खूपच  सोपं आहे. हे मिश्रण रोपांच्या मुळाशी घाला आणि स्प्रे मारा.  याचा वापर सकाळ-संध्याकाळ केल्यानं रोपांवर चांगला परिणाम दिसून येईल. कडक उन्हात हा स्प्रे रोपांवर मारू नका. कारण यामुळे पानं खराब होण्याचा धोका असतो.

ही कोणतीही जादू नाही ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हे मिश्रण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा. जवळपास १० ते १५ दिवसांच्या अंतरानं तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला सुकलेल्या  फांद्यांना नवीन कोंब आलेले दिसतील आणि रोप पुन्हा बहरू लागेल.  ज्या रोपांची वाढ थांबलेली आहे त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

एक्सपर्ट्स सांगतात  की या रोपाचा मुख्य आधार तांदूळ आहे. तांदळात भरपूर प्रमाणात एनपीके यांसारखे खनिजं असतात. एक लिटर पाण्यात १ मूठभर तांदूळ घातल्यानं  सर्व व्हिटामीन्स आणि पोषक तत्व मिळतात. जी रोपाला पुन्हा सक्रीय करण्यासाठी आवश्यक असतात.

बेकींग सोडा

बेकींग सोडा रोपांसाठी एखाद्या कवचाप्रमाणे काम करतो.  ज्यामुळे मातीची पीएच लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते आणि मुळांना बुरशी लागत नाही. जेव्हा रोपांची मुळं बुरशीपासून मुक्त होतात तेव्हा ते  मातीतील पोषण व्यवस्थित शोषून घेतात आणि पुन्हा बहरलेली दिसतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Revive withered plants with baking soda, rice, and vinegar mix.

Web Summary : Wilted plants can be revived using a simple homemade solution. A mix of rice water, baking soda, and vinegar nourishes roots and protects from harmful elements, promoting healthy growth. Apply as a spray for best results.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स