गडद पिवळ्या - केशरी रंगाचे भरगच्च फुललेले गोंड्याचे फुल दिसायला खूपच सुंदर व आकर्षक दिसते. आपल्याकडील प्रत्येक खास प्रसंगी किंवा सणावाराला गोंड्याच्या फुलांचा (marigold plant from dried flowers) वापर फार मोठ्या प्रमाणांत केला जातो. गोंड्याच्या फुलांच्या माळा, हार, तोरणं यांचा वापर आपण हमखास प्रत्येक सणावाराला करतो. नुकतेच गणेशोत्सव (grow marigold at home using waste flowers) आपण सगळ्यांनीच मोठ्या उत्साहात पार पाडला. या सणादरम्यान आपण गणपती बाप्पांसाठी वापरलेली गोंड्यांची फुलं फार मोठ्या प्रमाणावर असतील(recycle marigold flowers to grow plants).
या शिल्लक राहिलेल्या फुलांचा काहीच उपयोग नाही म्हणून आपण निर्माल्य समजून ही फुले फेकून देतो. परंतु ही फुले फेकून न देता आपण याच फुलांचा वापर करून पुन्हा त्यापासून नवीन शेंडूचे रोपं कुंडीत घरच्याघरीच लावू शकतो. आपल्याकडे असलेल्या जुन्या आणि सुकलेल्या झेंडूच्या फुलांतील बियांपासूनच नवीन रोपे तयार करू (regrow marigold from old flowers) शकतो. झेंडूची वापरलेली फुले निर्माल्य म्हणून फेकून न देता, त्यापासून नवीन रोप कसे तयार करायचे याची सोपी कृती पाहूयात..
जुन्या झेंडूच्या फुलातील बियांपासून नवीन रोप कसे तयार करावे...
आपल्या बागेला किंवा घराला सुंदर बनवण्यासाठी, केशरी - पिवळ्या भरगच्च अशा झेंडूच्या फुलांचे किमान एकतरी रोपटे असायलाच हवे. पण, नवीन रोपे विकत घेण्याऐवजी, तुम्ही जुन्या फुलांच्या बियांपासूनच नवीन रोपे तयार करू शकता. ही एक सोपी आणि सोयीची पद्धत आहे.
यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता आहे...
१. वापरलेली झेंडूची फुले (पूर्णपणे सुकलेली)
२. माती (सेंद्रिय खत मिसळलेली)
३. एक लहान कुंडी किंवा ट्रे
४. पाणी
५. शेणखतं
रोपं कसे लावायचे ?
१. जुने, पूर्णपणे सुकलेले झेंडूचे फूल घ्या. त्याचे देठ काढून टाका आणि फूल दोन्ही हातांच्या तळव्यावर हळूवारपणे चोळा. असे केल्याने फुलाच्या आत लपलेल्या बारीक काळ्या बिया बाहेर येतील. या बिया काळजीपूर्वक गोळा करा. चांगल्या प्रतीचे रोप तयार करण्यासाठी, फक्त काळ्या रंगाच्याच बियांची निवड करा. हलक्या, पांढऱ्या किंवा अपूर्ण वाढलेल्या बिया घेणे टाळा.
२. एक लहान कुंडी किंवा ट्रे घ्या. त्यात सेंद्रिय खत मिसळलेली भुसभुशीत माती भरा. माती फार घट्ट नसावी, जेणेकरून बियांना वाढायला जागा मिळेल. निवडलेल्या बिया मातीच्या पृष्ठभागावर काळजीपूर्वक पसरा. बिया खूप जवळजवळ पेरू नका. बिया पेरल्यावर, त्यावर मातीचा एक पातळ थर (जास्तीत जास्त १ ते २ सेमी) टाका.
३. बिया पेरल्यावर, त्यात हलके पाणी घाला. यासाठी पाण्याचा फवारा वापरणेच उत्तम राहील.
४. ही कुंडी किंवा ट्रे अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. माती ओलसर राहील याची खात्री करा, पण ती जास्त ओली होणार नाही याची काळजी घ्या. साधारणपणे ५ ते ७ दिवसांत बियांना अंकुर फुटायला सुरुवात होईल.
५. जेव्हा रोपे ४ ते ५ इंच उंच होईल आणि त्यांना ३ ते ४ पाने येतील, तेव्हा तुम्ही ते रोप मोठ्या कुंडीत किंवा बागेतील योग्य ठिकाणी लावू शकता.
६. झेंडूच्या रोपाला दररोज ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. महिन्यातून एकदा, घरी तयार केलेले खत, जसे की गांडूळ खत, शेणखत किंवा लाकडी राख घाला. तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचा देखील वापर करू शकता.
या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेत जुन्या व सुकलेल्या झेंडूच्या फुलांच्या बियांपासूनच नवीन आणि सुंदर झेंडूचे रोप लावू शकता.