Lokmat Sakhi >Gardening > पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

Preparation of organic compost using waste tea powder : उरलेली चहापत्ती फेकून देण्याऐवजी झाडांसाठी घरगुती खत तयार करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2024 04:47 PM2024-06-02T16:47:54+5:302024-06-03T10:16:31+5:30

Preparation of organic compost using waste tea powder : उरलेली चहापत्ती फेकून देण्याऐवजी झाडांसाठी घरगुती खत तयार करा..

Preparation of organic compost using waste tea powder | पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

अनेकांच्या दिवसाची सुरुवात मस्त वाफाळलेल्या चहानेच होते (Tea Waste for Plants). घोटभर चहा प्यायल्याने अनेकांना तरतरी येते. अनेकांची चहा बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे (Gardening Tips). पण चहा तयार झाल्यानंतर आपण चहा गाळतो. उरलेली चहापत्ती फेकून देतो. पण उरलेली चहा पावडर फेकून देण्याऐवजी आपण त्याचा वापर झाडांसाठीही करू शकता (Planting Trees). यामुळे झाडांची योग्य वाढ होईल.

शिवाय त्यातील पोषक तत्वांमुळे, कुंडीतल्या रोपाला नवीन जीवन मिळेल. ज्यामुळे रोप फळं आणि फुलांनी बहरेल. पण उरलेल्या चहापत्तीचा वापर करून कंपोस्ट कसा तयार करायचा? यामुळे कुंडीतल्या रोपांना कोणते फायदे मिळतील? पाहूयात(Preparation of organic compost using waste tea powder).

कंपोस्ट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेली चहापत्ती पावडर

शरीर वेडेवाकडे सुटते आहे? 'या' भाजीच्या रसात मिसळा लिंबाचा रस; महिनाभरात घटेल वजन

छिद्र असलेलं मातीचं भांडं

झाकण्यासाठी झाकण

उरलेल्या चहापत्तीचे कंपोस्ट कसे तयार करायचे?

- उरलेल्या चहापत्तीचे कंपोस्ट करण्यासाठी, आधी चहापत्ती स्वच्छ धुवून घ्या. नंतर छिद्र असलेलं मातीचं भांडं घ्या. त्यात उरलेली चहापत्ती घालून ठेवा. नंतर झाकण लावा. परंतु, मातीचं भांडं थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेऊ नये.

ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..

- चहापत्ती लवकर कुजतात. दीड महिन्यानंतर आपल्याला त्यावर पांढरी बुरशी दिसेल. ही बुरशी चहाच्या पानांचे कंपोस्टमध्ये रूपांतर करते.

- मात्र, हे खत पूर्णपणे तयार होण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. जेव्हा कंपोस्ट पूर्णपणे तयार होते, तेव्हा ते सुकते आणि अर्धे कमी होते. आता हे खत भांड्यातून काढून उन्हात पसरवा. नंतर कुंडीतल्या मातीत मिसळा.

Web Title: Preparation of organic compost using waste tea powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.