Join us

कुंडीतली रोपं नेहमीच राहतील हिरवीगार- टवटवीत! आठवड्यातून एकदा करा फक्त ३ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 13:19 IST

Gardening Tips: आठवड्यातून एकदा तुमच्या बागेतल्या रोपांची पुढे सांगितलेल्या पद्धतीने काळजी घेतली तर बागेतली रोपं कधीच खराब होणार नाहीत..(plant care tips for every week)

ठळक मुद्दे आपली बाग कायम हिरवीगार आणि टवटवीत दिसण्यासाठी थोडी विशेष काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहा..

आपण मोठ्या हौशीने वेगवेगळी रोपं आणून आपल्या छोट्याशा बाल्कनीत किंवा अंगणात सजवतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर रोपांची विशेष खरेदी केली जाते. पण एवढ्या सगळ्या रोपांची काळजी एकदम घेणं होत नाही. रोपांकडे दुर्लक्ष झालं की मग काही दिवसांतच आपली बाग सुकल्यासारखी किंवा रोपं माना टाकल्यासारखी गळून जातात. कारण रोज पाणी आणि ऊन या गोष्टी त्यांना मिळत असल्या तरी थोडी विशेष काळजी घ्यावी लागतेच (how to take care of plants once in a week?). आता आपली बाग कायम हिरवीगार आणि टवटवीत दिसण्यासाठी थोडी विशेष काळजी घ्यायची (plant care tips for every week) म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहा.. (how to keep plants always green and fresh?)

 

आठवड्यातून एकदा रोपांची कशी काळजी घ्यावी?g

आपल्या बागेतली रोपं कायमच हिरवीगार, टवटवीत राहण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ home_sattva या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात- नाक गळतं? २ विड्याच्या पानांचा सोपा उपाय- त्रास कायमचा जाईल

१. यामध्ये असं सांगितलं आहे की आठवड्यातून एकदा तुमच्या प्रत्येक झाडाचं व्यवस्थित बारकाईने निरीक्षण करा आणि रोपावरची जी काही पानं पिवळी पडली असतील किंवा सुकून गेली असतील ती पानं काढून टाका.

 

२. निम ऑइल आणि वॉशिंग लिक्विड हे दोन पदार्थ २: १ या प्रमाणात एकत्र करा आणि त्यामध्ये पाणी टाका. आता हा स्प्रे झाडांवर मारा. यामुळे जर झाडांवर कुठला रोग पडला असेल किंवा किडा आला असेल तर तो दूर होतो. 

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

३. आठवड्यातून एकदा झाडांवर पाणी शिंपडून पानं व्यवस्थित स्वच्छ करा. यामुळे पानांवर जमा झालेली धूळ, घाण निघून जाते आणि रोपं छान स्वच्छ, हिरवीगार, टवटवीत दिसू लागतात.

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी