मनी प्लांट (Money Plant) हे असे रोप आहे जे जवळपास प्रत्येक घरात दिसते. हे केवळ घराची शोभाच वाढवत नाही, तर सकारात्मक ऊर्जा (positive energy) आणते असेही मानले जाते. मनी प्लांटला जमिनीत तसेच पाण्यातही वाढवता येते. जर तुम्हाला तुमच्या घरात मनी प्लांट बाटलीत किंवा काचेच्या भांड्यात लावायचे असेल, तर काही सोप्या टिप्स फॉलो करा. (Is Money Plant Can Grow In Water)
योग्य फांदीची निवड
पाण्यात मनी प्लांट लावण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि त्यासाठी फार कमी गोष्टी लागतात. योग्य फांदींची निवड करा. मनी प्लांटची फांदी निवडताना ती किमान ६ इंच लांब असावी. फांदीला कमीत कमी २ ते ३ पाने आणि एक ‘नोड’ असावा. नोड म्हणजे पानांच्या खालील गाठीसारखा भाग, जिथून नवीन मुळे येतात. फांदीच्या खालच्या भागातील पाने काळजीपूर्वक काढून टाका. यामुळे ती पाने पाण्यात कुजणार नाहीत.
ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल
पाण्यात ठेवा
एक स्वच्छ काचेची बाटली किंवा भांडे घ्या आणि त्यात सामान्य तापमानाचे पाणी भरा. फांदीचा नोड असलेला भाग पूर्णपणे पाण्यात बुडालेला असावा.
जागेची निवड
हे भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश येणार नाही, पण पुरेसा नैसर्गिक प्रकाश मिळेल. थेट सूर्यप्रकाशामुळे पाण्यात शेवाळ (algae) जमा होऊ शकते.
गुलाबाचं रोप टराटरा वाढलं पण फुलांचा पत्ता नाही? मातीत ‘हे’ घरगुती खत मिसळा, फुलांनी बहरेल झाड
मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी?
मनी प्लांटची चांगली वाढ होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पाणी नियमितपणे बदलत राहा. दर ५ ते ७ दिवसांनी पाणी बदला. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहते आणि मुळांना वाढण्यास मदत होते. पाणी बदलताना भांडे स्वच्छ धुऊन घ्या. मनी प्लांटला थेट सूर्यप्रकाशाची गरज नसते. त्याला कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवल्यास त्याची पाने हिरवी आणि टवटवीत राहतात. जास्त सूर्यप्रकाशामुळे पाने पिवळी पडू शकतात किंवा जळून जातात.
पाण्यात लावलेल्या मनी प्लांटला खताची सहसा गरज नसते. पण जर तुम्हाला वाढ अधिक जलद हवी असेल, तर तुम्ही महिन्यातून एकदा पाण्यात थोडेसे लिक्विड फर्टिलायझर घालू शकता. वेळोवेळी वाढलेल्या फांद्यांची देठं कापून घ्या. यामुळे मनी प्लांट अधिक दाट होतो.