Join us

रोपं वाढतात भरपूर पण फुलंच येत नाही? कांद्याची साल ‘अशी’ कुंडीत घाला-फुलांनी डवरतील झाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:36 IST

How to Use Onion Peel to Plant Growth : कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium), लोह (Iron) आणि मॅग्नेशियम (Magnesium) असे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.

अनेकांना घरच्या घरी बाग फुलवण्याची इच्छा होते. शहरांमध्ये जागा कमी असली तरी, बाल्कनीमध्ये, टेरेसवर किंवा खिडकीच्या कडेला कुंड्या लावून आपली छोटीशी हिरवीगार बाग तयार करणं आता खूप सोपं झालं आहे. पण बागेची निगा राखणं म्हणजे खूप खर्चिक काम, असं अनेकांना वाटतं. बागेसाठी विशेष खतं आणणं, किटकनाशकं वापरणं यासाठी चांगलाच पैसा जातो. (How to Bloom Flowers Faster)

मात्र, तुमच्या घरातल्या एका साध्या पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमची बाग अगदी कमी खर्चात आणि सहज सुंदर करू शकता (Gardening Tips). ती गोष्ट म्हणजे कांद्याची साल! हो, आपण रोज कचरा समजून फेकून देतो ते कांद्याचे साल तुमच्या रोपांसाठी एक उत्तम खत आणि नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते. (How to Use Onion Peel to Plant Growth)

कांद्याच्या सालीचे फायदे (Benefits Of Onion Peel)

कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium), लोह (Iron) आणि मॅग्नेशियम (Magnesium) असे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक रोपांच्या वाढीसाठी, फुलांसाठी आणि फळांसाठी खूप महत्त्वाचे असतात. या घटकांमुळे रोपांची मुळं मजबूत होतात आणि त्यांना रोगांपासून संरक्षण मिळते.

घरी खत कसं बनवायचं? (How To Use Onion Peel For Plants)

कांद्याच्या सालीपासून खत बनवणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

१) एका भांड्यात कांद्याच्या साली घ्या आणि त्यात पाणी घाला. हे मिश्रण २४ ते ४८ तास तसेच ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. गाळलेले हे पाणी तुम्ही थेट रोपांच्या मुळाशी घालू शकता.

२) कांद्याच्या सालीची पावडर : कांद्याच्या साली उन्हात चांगल्या वाळवून घ्या. त्या पूर्णपणे सुकल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर तुम्ही मातीत मिसळून वापरू शकता.

३) कंपोस्ट खत : जर तुम्ही कंपोस्ट खत बनवत असाल, तर त्यात कांद्याच्या साली नक्की घाला. कंपोस्ट खतामध्ये कांद्याच्या सालीमुळे अधिक पोषक घटक वाढतात आणि खत लवकर तयार होते.

कांद्याच्या सालीचा स्प्रे

कांद्याच्या सालींचा वास काही किटकांना आवडत नाही. त्यामुळे, साली रात्रभर पाण्यात भिजवून त्या पाण्याचा स्प्रे रोपांवर केल्यास किड, पांढऱ्या माशी (White Flies), मुंग्या यांसारखे कीटक दूर राहतात.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स