तुळशीचं रोप (Tulsi Plant) भारतात प्रत्येक घरांमध्ये दिसून येते. फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर औषधी गुणांनीसुद्धा तुळशीचं रोप समृद्ध आहे. पाणी आणि ऊन दिल्यानंतरही तुळशीची पानं पिवळी होऊन पडतात आणि हळूहळू सुकू लागतात. जर तुम्हाला अशा समस्या असतील तर आरव्ही गार्डनर एक्सपर्ट्सनी याबाबत एक महत्वाचा सल्ला दिला आहे. (How To Take Care Of Tulsi Plant In Summer)
एक्सपर्ट्सनी केळ्याची साल सुकवण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. अनेकदा लोक केळी खाऊन सालं फेकून देतात. पण हेच केळीचे साल तुळशीसाठी संजीवनी ठरू शकते. याचा वापर करून तुम्ही तुळशीचं रोप बहरलेलं ठेवू शकता. महागडी खतं विकत घेण्याची काही गरज नाही.(Natural Way To Prevent Tulsi Plant Drying Up By Using Banana Peel)
तुळशीची पानं पिवळी पडण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं की नायट्रोजन किंवा पोटॅशियमची कमतरता, जास्त पाणी देणं, माती जास्त कठीण होतं. जेव्हा मातीत पोषक तत्व नष्ट होतात तेव्हा रोप पानांना पोषण देणं बंद करते. ज्यामुळे पानं पिवळी पडतात. तुळशीला पोटॅशियम, मॅग्नेशियमची जास्त आवश्यकता असते. केळ्याच्या सालीतही भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते.
केळ्याच्या सालीचा वापर
केळीची सालं फेकण्याऐवजी सुकवून या सालींचा वापर करणं एक मास्टर स्ट्रोक आहे. यात पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमचा स्तर उच्च असतो. यामुळे फक्त मुळं मजबूत होत नाहीत तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासही मदत होते. सुकलेल्या केळीच्या सालीची पावडर मातीत हळहूळू विरघळते. ज्यामुळे रोपाला दिर्घकाळ पोषण मिळते.
कधीच ओलसर साली थेट मातीत घालू नका. कारण यामुळे कीड किंवा बुरशी लागण्याची शक्यता असते. सगळ्यात आधी केळीची सालं कडक उन्हात सुकवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये या सालींची पावडर तयार करून घ्या. ही पावडर तुम्ही महिनोंमहिने साठवून ठेवू शकता. हे एक शुद्ध आणि फ्री होममेड खत आहे. तुळशीच्या मंजिरी येऊ लागल्यानंतर लगेच काढून टाका. तुळस कमीत कमी ४ ते ५ तास उन्हात ठेवा. तुळशीच्या रोपात मॉईश्चर असेल तर जास्त पाणी घालू नका.ओव्हर वॉटरींग करणं टाळा.
Web Summary : Tulsi plants dry in summer due to nutrient deficiencies. Banana peels, rich in potassium, magnesium, and calcium, act as natural fertilizer. Drying and powdering peels nourishes the soil, strengthening roots and boosting immunity for healthy growth.
Web Summary : पोषक तत्वों की कमी से तुलसी के पौधे गर्मियों में सूख जाते हैं। पोटेशियम, मैग्नीशियम और कैल्शियम से भरपूर केले के छिलके प्राकृतिक उर्वरक के रूप में काम करते हैं। छिलकों को सुखाकर पाउडर बनाना मिट्टी को पोषण देता है, जड़ों को मजबूत करता है और स्वस्थ विकास के लिए प्रतिरक्षा को बढ़ाता है।