घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट (Money Plants) खूपच खास मानला जातो. बऱ्याच लोकांची तक्रार असते की त्यांच्या घरातील मनी प्लांट व्यवस्थित वाढत नाही. पानं गळून पडतात जर तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काही सोप्या गार्डनिंग टिप्स तुमचं काम अजून सोपं करू शकतात. (How To Grow Money Plants At Home)
गार्डन हूड नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोशल मीडिया एक्सपर्ट्सनी मनी प्लांट्स वेगानं वाढवण्यासाठी एक सिक्रेट शेअर केलं आहे. असा दावा केला जात आहे की घरगुती उपयांनी फक्त 15 दिवसांत तुम्ही मनी प्लांट दाट-चमकदार बनवू शकता. मनी प्लांट वाढवण्यासाठी जादूई वस्तू तुम्हाला किचनमध्येच मिळेल. (Gardening Tips)
मनी प्लांटच्या वाढीसाठी सिक्रेट वस्तू कोणती?
ज्या जादूई वस्तूबाबत आपण बोलत आहोत ती किचनमध्ये चहा करण्यासाठी वापरली जाणारी चहा पावडर आहे. फ्रेश चहा पावडर व्यतिरिक्त वापरेल्या चहा पावडरचाही वापर तुम्ही करु शकता. मनी प्लांटसाठी हे एका खाद्याप्रमाणे काम करते. गार्डनिंग एक्सपर्ट्सनी ताजी चहा पावडर रोपांमध्ये वापरण्याबाबत सांगितले आहे. चहा पावडरमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असते (Ref). जे रोपांना दाट आणि मोठे बनवण्यास मदत करते. नायट्रोजन पानांच्या वाढीसाठी एक महत्वाचे तत्व आहे. चहा पावडर काही प्रमाणात एसिडीक असते जे मनी प्लांटसाठी फायदेशीर ठरते. यामुळे मातीची पीएच लेव्हल संतुलित राहते.
गार्डनिंग एक्सपर्ट्सच्या मते खत घालण्याआधी माती व्यवस्थित खोदून घ्या. नंतर त्यातली पिवळी पानं काढून टाका. कुंडी १० इंचाची असेल तर चमचानं फ्रेश चहा पावडर मिसळा ही प्रक्रिया दर १५ दिवसांनी रिपीट करत राहा. जेणेकरून मनी प्लांटला पोषक तत्व मिळतील.
रोपं वाढतात भरपूर पण फुलंच येत नाही? कांद्याची साल ‘अशी’ कुंडीत घाला-फुलांनी डवरतील झाडं
या पद्धतीनं चहा पावडर घाला
जर तुम्ही चहा पावडरचा वापर करणार असाल तर साखर आणि दूध व्यवस्थित निघेल याची काळजी घ्या. उन्हात सुकवून ठेवा. चहा पावडर ओली राहणार नाही याची काळजी घ्या अन्यथा बुरशी वाढण्याचा धोका असतो. नंतर सुकी चहा पावडर तुम्ही खोदल्यानंतर मातीत मिसळू शकता. तुम्ही एक चमचा चहा पावडर २४ तासांसाठी तशीच ठेवा. नंतर गाळून लिक्विड फर्टिलायजरप्रमाणे वापरा.
मनी प्लांट थेट उन्हात ठेवण्याची चूक करू नका. मनी प्लांट इन्डायरेक्ट सनलाईटमध्येच ठेवा. माती पूर्णपणे सुकू द्या. पण रोपाला जास्त पाणी घालू नका. चहा पावडर गरजेपेक्षा जास्त वापरू नका. जास्त चहा पावडर घातल्यानं माती एसिडीट होऊ शकते. ज्यामुळे रोपाचं नुकसान होऊ शकतं.