Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > मोगऱ्याला रोपाला फुलंच नाही? ५ रुपयांच्या तुरटीचा कमालीच उपाय, भरगच्च मोगऱ्याची येतील फुलं

मोगऱ्याला रोपाला फुलंच नाही? ५ रुपयांच्या तुरटीचा कमालीच उपाय, भरगच्च मोगऱ्याची येतील फुलं

Mogra Plant Gardening Tips : फक्त ५ रुपयांत मिळणाऱ्या तुरटीचा वापर करून तुम्ही सुंदर रोपं फुलवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:40 IST2026-01-16T17:19:26+5:302026-01-16T17:40:07+5:30

Mogra Plant Gardening Tips : फक्त ५ रुपयांत मिळणाऱ्या तुरटीचा वापर करून तुम्ही सुंदर रोपं फुलवू शकता.

Mogra Plant Gardening Tips : Use Alum For Mogra Plant Growth | मोगऱ्याला रोपाला फुलंच नाही? ५ रुपयांच्या तुरटीचा कमालीच उपाय, भरगच्च मोगऱ्याची येतील फुलं

मोगऱ्याला रोपाला फुलंच नाही? ५ रुपयांच्या तुरटीचा कमालीच उपाय, भरगच्च मोगऱ्याची येतील फुलं

प्रत्येकाला असं वाटतं की घरातील मोगऱ्याचं रोप (Mogra Plant) सुगंधित फुलांनी बहरून जावं. पण खत आणि पाणी योग्य प्रमाणात देऊनही मोगऱ्याच्या रोपाला फुलं व्यवस्थित येत नाहीत. एक्सपर्ट्सनी या समस्येचं अचुक आणि स्वस्त समाधान सांगितलं आहे. (Mogra Plant Gardening Tips) मोगऱ्याच्या रोपाला अधिक फुलं येण्यासाठी कोणत्याही महागड्या केमिकल्सची आवश्यकता नाही. फक्त ५ रुपयांत मिळणाऱ्या तुरटीचा वापर करून तुम्ही सुंदर रोपं फुलवू शकता. पांढरा तुरटीचा खडा मोगऱ्याच्या रोपासाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे मातीची पीएच लेव्हल सुधारण्यास मदत होते. (Use Alum For Mogra Plant Growth)

मोगऱ्याच्या रोपाला एसिडीक माती आवडते. जर पीएच लेव्हल योग्य नसेल तर रोप पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेत नाही. तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि मातीत २ ते ३ इंच आत दाबा. जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा तुरटी हळू हळू मातीत मिसळेल. ज्यामुळे रोपाच्या मुळांना खत शोषून घेण्यास मदत होईल आणि कळ्या फुलतील.  

मोगऱ्याची फुलं नेहमी नवीन फांद्यांवरच येतात. यामुळे रोपाच्या जुन्या, सुकलेल्या फांद्या काढून टाकणं गरजेचं आहे. प्रुनिंगनंतर नवीन फांद्या येतात तितकेच जास्त फुलं येतात. मोगरा एक 'सन लिव्हिंग प्लांट' आहे. हे रोप सावलीत ठेवण्याची चूक करू नका. मोगऱ्याच्या रोपाला जवळपास ५ ते ६ तासाचं ऊन मिळायला हवे. ऊन कळ्यांना फुलण्यास मदत करत आणि रोपाला ऊर्जा देते. म्हणून रोप योग्य ठिकाणी ठेवा.

१ वाटी बेसनाच्या करा मऊ, लुसलुशीत इडल्या; सोपी रेसिपी, झटपट बनेल नाश्ता-पोटभर खाल

मोगऱ्याची माती घट्ट असेल तर त्याची वाढ थांबते. दर १५ दिवसांला एकदा खुरपणीच्या मदतीनं रोपाची माती खोदायला हवी. खोदल्यामुळे रोपाच्या मुळांना ऑक्सिजन मिळते. ज्यामुळे रोप हेल्दी राहते.  माती २ ते ३ तास उन्हात राहू द्या. नंतर पाणी आणि खत घाला.

ऑर्गेनिक खत घाला

माती एसिडिक बनवण्यासाठी तुरटीसोबत घरातील काही वस्तूंचा वापर तुम्ही करू शकता. वापरलेली चहा पावडर धुवून सुकवून घ्या. महिन्यातून एकदा २ चमचे हे खत मातीत मिसळा. याव्यतिरिक्त कांद्याची सालं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा मग पाणी मोगऱ्याच्या रोपात घाला. यातील पोटॅशियम फुलांची संख्या वाढवण्यास मदत होते. 

हळदी कुंकवाला जाण्याआधी १० मिनिटांत घरीच करा फेशियल; ५ स्टेप्स, चेहऱ्यावर येईल तेज

मोगऱ्याच्या रोपाला मॉईश्चराईज माती आवडते. मातीत नेहमीच हलका ओलावा राहायला हवा.  पाणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्यावेळी द्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत माती खूपच लवकर सुकत असेल तर रोपावर तुम्ही पाणी शिंपडू शकता. ज्यामुळे पानं फ्रेश राहतात.

Web Title : फिटकरी के इस आसान उपाय से पाएं भरपूर मोगरा के फूल!

Web Summary : अधिक मोगरा के फूल चाहिए? मिट्टी का पीएच सुधारने के लिए फिटकरी का उपयोग करें। पुरानी शाखाओं को काटें, 5-6 घंटे धूप सुनिश्चित करें और मिट्टी को हवादार बनाएं। अतिरिक्त पोषक तत्वों के लिए इस्तेमाल की हुई चाय की पत्तियां या प्याज के छिलके का पानी डालें। सर्वोत्तम परिणामों के लिए मिट्टी को नम रखें।

Web Title : Get abundant jasmine blooms with this simple alum trick!

Web Summary : Want more jasmine flowers? Use alum to improve soil pH. Prune old branches, ensure 5-6 hours of sunlight, and aerate the soil. Add used tea leaves or onion peel water for extra nutrients. Keep the soil moist for best results.