Join us

रोपाला पाणी कधी घालावं, ओळखण्याची भन्नाट ट्रिक! योग्य प्रमाणात पाणी मिळून रोपाला येईल हिरवागार बहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2025 09:50 IST

Gardening Tips : Checking Soil Moisture Depth Without Touching : how to measure soil moisture : checking soil wetness in garden : gardening hacks for soil moisture : know when to water your plants like a pro - follow steps : plant watering tips : when to water plants : रोपाला उगाचचं जास्तीचे पाणी देणे देखील वायफळ ठरु शकते, म्हणून रोपाला पाणी कधी घालावं ते ओळखण्याची सुपरईझी ट्रिक...

प्रत्येक झाडाला किंवा रोपाला वाढण्यासाठी, फळा- फुलांचा बहर येण्यासाठी उत्तम सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज असते. पाण्याविना रोपांची वाढ अधुरीच. आपण आपल्या घराच्या (Gardening Tips) बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये मोठ्या हौसेनं रोप लावतो, त्यांची काळजीही तितकीच घेतो. परंतु या रोपांना पाणी कधी, किती आणि योग्य प्रमाण नेमकं काय असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. रोपांसाठी पाणी आवश्यक असले तरी, अनेकदा जास्त पाणी ( know when to water your plants) घातल्यामुळे रोपं मरतात, तर कधी कमी पाण्यामुळे ती सुकतात. त्यामुळे रोपांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी देणे खूप गरजेचे आहे(gardening hacks for soil moisture).

बरेचदा रोपांना पुरेसे पाणी सतत देत राहिल्याने त्यांची वाढ चांगली होईल असं समजून आपण त्यांना पाणी घालत राहतो. पण त्याचा काहीच फायदा न होता नुकसानच होते. यातही, विशेषतः पावसाळ्यात रोपांना पाणी घालावे की घालू नये अशा विचारात आपण असतो. अशा परिस्थितीत, रोपाला पाणी कधी आणि किती देणं योग्य आहे हे ओळखणं खूप (Checking Soil Moisture Depth Without Touching) गरजेचं आहे. यासाठीच, आपण एका साध्यासोप्या भन्नाट ट्रिकचा वापर करु शकतो. ही इन्स्टंट ट्रिक करून आपल्याला चटकन ओळखता येऊ शकते की रोपांना पाणी घालण्याची गरज आहे की नाही... यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात... 

रोपाला पाणी कधी घालावं, ओळखण्याची भन्नाट ट्रिक! 

१. एक स्वच्छ चॉपस्टिक किंवा बांबूची लाकडी काटी घ्या. शक्यतो अशी लाकडी काठी घ्या जिचा रंग गडद नसेल. हलक्या रंगाच्या लाकडी काठीवर ओलावा अगदी सहज ओळखता येते. आपण घरातील फुलझाडूची देखील पातळ लाकडी काठी वापरु शकता. 

२. आता त्या लाकडी काठीला किंवा चॉपस्टिकला रोपाच्या कुंडीतील मातीमध्ये थेट तळापर्यंत जाईल इतकं हलक्या हाताने थोडा दाब देत खोलवर रोवून घ्या. लक्षात ठेवा ही काठी रोपाच्या अगदी जवळील भागात रोवून घ्यावी. कुंडीच्या बरोबर मध्ये जिथे रोप लावतो तिथे खोलवर रोवून घ्यावी. कुंडीत आजूबाजूला इतर कोणत्याही ठिकाणी रोवू नका. 

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर -घरभर दरवळेल सुगंध...    

३. काही सेकंद त्याच ठिकाणी लाकडी काठी रोवून ठेवून द्या, नंतर थोडं हलक गोल फिरवून हळूवारपणे बाहेर काढा.

४. लाकडी काठी बाहेर काढल्यानंतर जर एकदम स्वच्छ आणि कोरडी असेल, तर याचा अर्थ माती कोरडी आहे आणि झाडाला पाण्याची गरज आहे. पण जर लाकडी काठी हलकीशी ओलसर असेल किंवा त्यावर माती चिकटलेली असेल, तर याचा अर्थ मातीमध्ये ओलावा आहे आणि सध्या रोपाला पाणी देण्याची गरज नाही.

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वाढ नाही? स्वयंपाकघरातील पांढरा पदार्थ करेल कमाल - पानं होतील हिरवीगार...

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

५. आपण या लाकडी काठीवर ओलसरपण किती खोलवर आहे हेही सहजपणे पाहू शकता. जर फक्त वरचा भाग कोरडा असेल आणि खालील माती ओलसर असेल, तर सध्या पाणी देऊ नका. पण जर लाकडी काठीच्या अर्ध्याहून अधिक भागावर माती कोरडी असेल, तर समजा की रोपाला पाणी देणे फारच गरजेचे आहे. 

६. अशाप्रकारे ही चॉपस्टिक टेस्ट तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की, कोणत्या झाडाची माती किती कोरडी झाली आहे. मातीतील ओलावा नेमका किती आहेत हे योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठी महागडे उपकरणे वापरण्याची किंवा हात मातीत घालून तपासायची अजिबात गरज नाही. फक्त एक चॉपस्टिक किंवा बांबूची लाकडी काठी घ्या आणि काही सेकंदांतच तुम्हांला कळेल की रोपाला पाण्याची गरज आहे की नाही.

टॅग्स :बागकाम टिप्सपाणीइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी