खूप काळजी घेऊनही तुळशीचं रोप चांगलं वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते. आपण मोठ्या हौशीने दारासमोर किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचं रोप लावतो. तिला नियमितपणे पाणी घालतो. पण तरीही तिची वाढ चांगली होत नाही. ती छान बहरून हिरवीगार, टवटवीत होत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत तर थंडीचा कडाका वाढला की अनेकांच्या घरच्या तुळशीही सुकायला लागतात किंवा त्यांच्या पानांचा आकार अगदी बारीक होऊन जातो. पानं कमी आणि काड्याच जास्त अशी तुळशीची अवस्था होऊन जाते. असं जर तुमच्याही तुळशीच्या बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(how to take care of tulsi plant in winter season?)
तुळशीच्या रोपाची चांगली वाढ व्हावी म्हणून उपाय
तुळशीच्या रोपाची चांगली वाढ व्हावी यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले आपल्या रोजच्या जेवणात असणारे दोन पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात. त्यापैकी पहिला पदार्थ आहे हळद. हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल ॲण्टीफंगल गुणधर्म असतात.
त्यामुळे जर तुळशीच्या कुंडीमधल्या मातीमध्ये काही इन्फेक्शन असल्यास ते कमी होते. मातीचा कस वाढतो आणि तुळशीची चांगली वाढ होते. यासाठी वाटीभर पाण्यात १ टीस्पून हळद मिसळा आणि हे पाणी तुळशीला द्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. त्याचप्रमाणे साखरेचं पाणी आठवड्यातून २ ते ३ वेळा तुळशीला घातल्यास त्याचाही खूप चांगला परिणाम तुळशीच्या रोपावर दिसून येतो.
हे काही उपायही करून पाहा..
हळद आणि साखरेचं पाणी तुळशीला घातल्यास पानांचा आकार मोठा होतो. पानं अधिक हिरवीगार, टवटवीत दिसू लागतात. हे देन उपाय तर कराच पण त्यासोबतच तुळशीच्या रोपाला ४ ते ५ तास व्यवस्थित कडक ऊन मिळते आहे ना याचीही काळजी घ्या. कारण छान स्वच्छ ऊन मिळालं की तुळशीचं रोप जोमात वाढतं.
हिवाळा सुरू होताच केस गळणं वाढलं? 'हा' सोपा उपाय महिनाभर करा, केस गळणं बंद होईल
यासोबतच तुळशीला खूप जास्त पाणी तर होत नाही ना, याकडेही लक्ष द्या. गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यानेही रोपांची मुळं सडतात आणि त्यांची चांगली वाढ होत नाही.
Web Summary : Is your Tulsi plant dry? Revive it using turmeric and sugar water from your kitchen. Ensure ample sunlight and avoid overwatering for healthy growth.
Web Summary : क्या आपका तुलसी का पौधा सूख गया है? अपनी रसोई से हल्दी और चीनी के पानी का उपयोग करके इसे पुनर्जीवित करें। स्वस्थ विकास के लिए पर्याप्त धूप सुनिश्चित करें और अधिक पानी देने से बचें।