उन्हाळ्याचे दिवस जसे आपल्याला जड, त्रासदायक जातात तसेच ते रोपांसाठी, झाडांसाठीही अवघड असतात. कारण या दिवसांत कुंडीतल्या नाजुक रोपांनाही उष्णता सहन होत नाही. उन्हाचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे मग पुरेसं पाणी देऊनही या दिवसांत रोपं टवटवीत दिसत नाहीत. कोमेजल्यासारखी होतात. सुकून जातात. असं तुम्ही लावलेल्या रोपांच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(how to take care of plants in summer season?)
उन्हाळ्यात रोपं सुकू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
उन्हाळ्यात रोपं सुकू नयेत यासाठी त्यांना पाणी तर द्यायचं आहेच, पण त्या पाण्यात काही गोष्टी मिसळायच्या आहेत. यासाठी उपयुक्त ठरणारा एक पदार्थ म्हणजे बाजारात मिळणारा मस्टर्ड केक. याला आपण मोहरीची पेंड असं देखील म्हणताे.
गुढीपाडवा स्पेशल: केशर- बदाम श्रीखंड रेसिपी, फक्त १० मिनिटांत श्रीखंड तयार- घ्या झटपट रेसिपी
तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर मस्टर्ड केक मिळू शकतो. १ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये २ ते ३ चमचे मस्टर्ड केक घाला. आता हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि २४ तास तसंच झाकून ठेवा. यानंतर ते गाळून घ्या. त्यामध्ये २ लीटर साधं पाणी घाला आणि मग हे पाणी रोपांना द्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. हा उपाय केल्याने मातीही कसदार राहाते आणि रोपांनाही पुरेसं पोषण मिळतं. हा उपाय simplegardeningmarathi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हे उपायही करून पाहा..
१. रोपांची थोडी जागा बदला. ज्या ठिकाणी जास्त ऊन येणार नाही, अशा ठिकाणी रोपं ठेवा.
२. रोपांसाठी तुम्ही हिरव्या कपड्याचा पडदाही वापरू शकता. ज्या बाजुने रोपांवर जास्त ऊन येतं, त्या बाजुने हा पडदा लावा. उन्हापासून रोपांचं संरक्षण होईल.
उन्हात फिरून चेहरा काळा पडला? घरीच फक्त २० रुपयांत करा हायड्रा फेशियल, त्वचा चमकेल
३. रोपांना सकाळी लवकर पाणी घाला. कारण उष्णता वाढलेली नसल्याने पाणी कुंडीतल्या मातीत जास्त वेळ राहील. त्याचा रोपांना फायदा होतो. किंवा मग संध्याकाळी ५ वाजता पाणी घाला. पण सुर्यास्त झाल्यानंतर मात्र पाणी देणं टाळावं.
Web Summary : As summer heat wilts plants, nourish them with mustard cake water. Mix mustard cake in water, dilute, and apply every 15 days. Also, relocate plants to shadier spots, use green shade cloths, and water early mornings or late evenings for best results.
Web Summary : गर्मी की तपिश से पौधों के मुरझाने पर, सरसों केक के पानी से पोषण दें। सरसों केक को पानी में मिलाएं, पतला करें और हर 15 दिन में लगाएं। पौधों को छायादार स्थानों पर ले जाएं, हरे रंग के शेड कपड़े का उपयोग करें और सर्वोत्तम परिणामों के लिए सुबह जल्दी या देर शाम को पानी डालें।