आपण हौशीने लावलेली रोपं छान वाढावीत, हिरवीगार व्हावी, त्यांना भरपूर फुलं यावी, असं आपल्याला वाटत असतं. पण बऱ्याचदा आपल्या अपेक्षेप्रमाणे रोपं वाढत नाहीत. त्यामुळे मग कधी आपण त्यांना चांगलं खत- पाणी घालतो तर कधी त्यांची छटाई करतो. कारण रोपांची छाटणी केल्यानंतरही त्यांची छान वाढ होत असते. पण बऱ्याचदा रोपांची छाटणी केल्यानंतर त्यांची जशी काळजी घ्यायला हवी तशी आपल्याकडून घेतली जात नाही आणि मग रोपं कोमेजायला लागतात (How to Take Care of Plants After Pruning?). असं होऊ नये म्हणून छाटणी झाल्यानंतर नेमकं काय करावं आणि काय टाळावं ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे.(plant care after pruning)
फुलझाडांची छाटणी केल्यानंतर रोपांची कशी काळजी घ्यावी?
१. सगळ्यात आधी तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रोपांची छाटणी झाल्यानंतर ते अतिशय नाजूक अवस्थेत जातात. त्यामुळे त्यांची थोडी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
हनुवटीवर अचानकच केस वाढू लागले? ३ चुका टाळा, केस येणं आपोआप बंद होईल
यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छाटणी झालेलं रोप खूप कडक उन्हामध्ये ठेवू नका. दिवसातून १ ते ३ तास ऊन त्याला पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त उन्हात ठेवल्याने ते जळू शकतं.
२. दुसरी गोष्ट म्हणजे रोपाची छाटणी झाल्यानंतर पुढचे ५ ते ६ दिवस त्याला कोणतेही खत घालू नका. कारण त्याचा बराच विस्तार कमी झालेला असतो. शिवाय ते रिकव्हरी मोडवर असतं. त्यामुळे त्याला कोणतंही खत घालू नका. शिवाय पाणीही माती ओलसर राहील एवढंच घाला. आपण आजारी असताना काही दिवस आपल्याला जास्त जेवण जात नाही. तसंच काहीसं छाटणी झालेल्या रोपाचंही असतं.
थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील
३. छाटणी झालेल्या ठिकाणी रोपांवर रोग पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जिथे जिथे रोपाची छाटणी केली आहे, तिथे तिथे लगेच थोडी हळद लावा. यामुळे त्या ठिकाणी जंतूंची वाढ होत नाही आणि रोपावर रोग पडण्याचा धोका बराच कमी होतो.
Web Summary : After pruning, plants need special care. Avoid harsh sunlight and fertilizers for a week. Water moderately and apply turmeric to cut areas to prevent infection, promoting healthy growth and abundant blooms.
Web Summary : छंटाई के बाद, पौधों को विशेष देखभाल की ज़रूरत होती है। एक हफ़्ते तक तेज़ धूप और उर्वरकों से बचें। मध्यम रूप से पानी दें और संक्रमण से बचने के लिए कटे हुए क्षेत्रों पर हल्दी लगाएँ, जिससे स्वस्थ विकास और भरपूर फूल आ सकें।