Join us

उन्हाळ्यात जेड प्लांट सुकलं, पानं गळू लागली? ६ टिप्स- घर प्रसन्न ठेवणारं हे रोप वाढेल जोमानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 18:41 IST

How To Take Care Of Jade Plant In Summer?: उन्हाळ्यात जर तुमचं जेड प्लांट सुकत चाललं असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टी नक्की ट्राय करून बघा..(gardening tips for jade plant)

ठळक मुद्देझेड प्लांटच्या वाढीसाठी कॅल्शियमचीही गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा झेड प्लांटच्या कुंडीत थोडासा चुना घाला किंवा मग खडू कुटून त्याची पावडर घाला.

काही रोपं अशी असतात जी खूप कमी जागेतही छान येतात. त्यामुळे छोट्याशा बाल्कनीमध्येही ती जास्त प्रमाणात लावली जातात. असंच एक रोप म्हणजे जेड प्लांट. हे रोप दिसायला तर अतिशय आकर्षक असतंच, पण अधून मधून तुम्ही ते इनडोअर म्हणून वापरून घराची सजावटही करू शकता. पण बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की उन्हाळ्याच्या दिवसात झेड प्लांट सुकत जातं. त्याची पानं खूपच सुरकुतल्यासारखी होऊन जातात. काही जणांच्या रोपाची तर पानं गळून नुसत्याच काड्या दिसू लागतात (How To Take Care Of Jade Plant In Summer?). असं होऊ नये यासाठी काय करायचं ते बघूया...(gardening tips for jade plant)

 

उन्हाळ्यात जेड प्लांटची काळजी कशी घ्यायची?

१. याविषयीचा व्हिडिओ evergreengarden1M या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेड प्लांट हे इनडोअर प्लांट नाही.

उन्हाळ्यात गुलाबाला फुलंच येईना? १ सोपा घरगुती उपाय- टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल गुलाबाचं रोप

या रोपाला ५ ते ६ तास चांगलं ऊन मिळण्याची गरज आहे. अधून मधून घराच्या सजावटीसाठी तुम्ही ते घरात आणून ठेवू शकता. पण ते कायम घरात ठेवून त्याचा इनडोअर म्हणून वापर करू नका.

२. जेड प्लांटची चांगली वाढ होण्यासाठी एक चमचा एप्सम सॉल्ट एक लीटर पाण्यात विरघळवा आणि हे पाणी रोपांवर शिंपडा तसेच कुंडीतल्या मातीतही घाला.

 

३. जेड प्लांटला पुरेसं पाणी मिळालं नाही तर त्याची पानं सुकून निस्तेज होतात आणि त्यावर सुरकुत्या यायला लागतात. त्यामुळे या रोपाला नियमितपणे पाणी घालायलाच हवं. 

४. जेड प्लांटची माती खूप चिकट असता कामा नये. ही माती अगदी भुसभुशीत ठेवा. रोपाची छान वाढ होईल.

फक्त १ चमचा बेसन- त्वचेच्या सगळ्या समस्यांसाठी बेस्ट सोल्यूशन! बघा कसा करायचा वापर

५. जेड प्लांटला जर भरगच्च करायचं असेल तर त्याच्या फांद्यांच्या टोकांची १ ते २ सेंटीमीटर एवढी छटाई करा. कटिंग केल्यानंतर तिथून आणखी नवीन फांद्या फुटतात आणि रोप अगदी भरगच्च होऊन जाते.

६. झेड प्लांटच्या वाढीसाठी कॅल्शियमचीही गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा झेड प्लांटच्या कुंडीत थोडासा चुना घाला किंवा मग खडू कुटून त्याची पावडर घाला.

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीसमर स्पेशलगच्चीतली बाग