Join us

कितीही काळजी घेतली तरी इनडोअर प्लांट्स जगत नाहीत? २ गोष्टी करा, तुमच्या घरातली रोपं कायम बहरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:11 IST

Gardening Tips For Indoor Plants : इनडोअर प्लांट्स घरात आणल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे..(how to take care of indoor plants?)

ठळक मुद्देआणल्यानंतर काही दिवस ते अगदी छान असतात. पण नंतर मात्र सुकायला लागतात. त्यांची पानं गळून जातात

हल्ली फ्लॅट संस्कृती वाढली आहे. त्यामुळे ज्यांना गार्डनिंगची खूप हौस आहे, त्यांची हौस एवढ्याशा बाल्कनीमध्ये रोपं लावून भागत नाही. त्यामुळे मग ते घरात ठेवण्यासाठी काही इनडोअर प्लांट्स विकत आणतात. इनडोअर प्लांट्स दिसायलाही खूपच छान असतात. ते जर घरात ठेवले तर घर सजीव, जिवंत वाटायला लागते. घराची शोभा वाढविण्यासाठीही इनडोअर प्लांट्स उपयुक्त ठरतात. पण त्यांच्या बाबतीत नेमकी एक अडचण अशी होते की अनेकांकडे ते प्लांट्स जास्त दिवस टिकतच नाही. आणल्यानंतर काही दिवस ते अगदी छान असतात. पण नंतर मात्र सुकायला लागतात. त्यांची पानं गळून जातात (how to take care of indoor plants?) आणि रोप जळायला लागतं. असं होऊ नये म्हणून त्यांच्या बाबतीत कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते पाहा..(gardening tips for indoor plants)

 

इनडोअर प्लांट्सची काळजी कशी घ्यावी?

१. पाणी

रोपांना पाणी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे ते त्यांना घातलं गेलंच पाहिजे. पण प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते. इनडोअर प्लांट्सला खूप कमी पाणी लागतं. कमीतकमी पाण्यात ते चांगले राहू शकतात.

तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील 'ब्युटीफूल'! फक्त ५ गोष्टी करा- पन्नाशीतही त्वचा राहील तरुण- सुंदर 

पण नेमकं इथेच आपलं चुकतं. इनडोअर प्लांट्सला कधी कधी खूपच कमी पाणी घातलं जातं तर कधी कधी पाण्याचा अतिरेक होतो. या दोन्ही प्रकारात ते सुकून जातं. म्हणूनच कोणत्याही इनडोअर प्लांटला पाणी घालण्याआधी कुंडीतल्या मातीला हात लावा. बोटांनी ती माती तपासा. जर माती तुम्हाला कोरडी, भुसभुशीत वाटली, तरच त्या रोपाला पाणी द्या..

 

२. सुर्यप्रकाशही गरजेचा..

इनडोअर प्लांट्स कमीतकमी उन्हात चांगले राहतात, हे आपल्याला माहितीच आहे. पण तरी त्यांनाही थोड्या सुर्यप्रकाशाची गरज असतेच.

मंगळागौरीला नऊवारी नेसणार? टिपिकल मराठी लूक येण्यासाठी 'या' पॅटर्नचं ब्लाऊज शिवा- घरंदाज, शालीन दिसाल

त्यामुळे ते घरात अशाच ठिकाणी ठेवा जिथे अप्रत्यक्षपणे थोडातरी सुर्यप्रकाश येईल. शिवाय ३ ते ४ दिवसातून एकदा त्यांना साधारण एका तासासाठी तरी बाल्कनीमध्ये किंवा मोकळ्या हवेत, जिथे थेट सुर्यप्रकाश येणार नाही अशा जागी नेऊन ठेवा. या दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या तर इनडोअर प्लांट्स सुकणार नाहीत. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी