Join us

ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 08:07 IST

How To Remove Mealybugs Infestation From Tulsi Plant Using Curd Or Buttermilk : How To Remove Mealybugs From Tulsi Plant : Best Home Remedies for Tulsi or Holy Basil insect infestation : How to remove fungus from Tulsi plant naturally : तुळशीच्या रोपावर जर कीड लागली असेल तर घरगुती उपाय म्हणून नेमकं काय करायचं ते पाहा...

तुळशीचं रोप आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच घरी असतं. हिरव्यागार पानांनी बहरलेली तुळस पाहिली की अगदी प्रसन्न वाटत. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाला फार (How To Remove Mealybugs Infestation From Tulsi Plant Using Curd Or Buttermilk) मोठे महत्व आहे. औषधी गुणांनी युक्त अशी तुळस फक्त धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुळशीचं रोपं ( How To Remove Mealybugs From Tulsi Plant) हे नाजूक असतं त्याची वेळोवेळी योग्य ती काळजी आणि देखभाल देखील तितकीच करावी लागते. तुळशीच्या (Best Home Remedies for Tulsi or Holy Basil insect infestation) रोपाकडे वेळीच योग्य लक्ष दिले नाही किंवा त्याची काळजी घेतली नाही तर रोप कोमेजून जाते किंवा पाने गळू लागतात(How to remove fungus from Tulsi plant naturally).

काहीवेळा आपल्या बागेतील इतर रोपांप्रमाणेच तुळशीच्या रोपावर देखील कीड लागते. तुळशीच्या रोपावर कीड लागल्यामुळे तुळशीची पाने गळून पडतात, रोप कोमेजून जाते, काही केल्या रोप पुन्हा हिरवेगार होत नाही, वाढ खुंटते अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत आपण तुळशीच्या रोपावर महागडे कीटकनाशक किंवा औषधांची फवारणी करतो. परंतु काहीवेळा इतके महागडे उपाय करून देखील याचा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी काही साधेसोपे पण घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. तुळशीच्या रोपावर जर कीड लागली असेल तर घरगुती उपाय म्हणून आपण नेमकं काय करु शकतो ते पाहूयात. 

तुळशीच्या रोपावर कीड लागली हे कसे ओळखाल ?  

जर तुमच्या तुळशीच्या रोपावर पांढऱ्या रंगाचे कीटक पानांवर चिकटलेले दिसत असतील, तर या पांढऱ्या माश्या (Whiteflies) असू शकतात. त्या झाडाच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात आणि झाड कमकुवत होतं. पानांवर जाळीसारखी रचना किंवा छोटे काळसर डाग दिसत असतील, तर हे माईट्स (Mites) असण्याची शक्यता असते. यामुळे पानं पिवळी पडतात आणि कोमेजतात. जर झाडावर लहान हिरव्या किंवा काळ्या रंगाचे कीटक दिसले, तर ते एफिड्स (Aphids) असतात. हे कीटकही रस शोषतात आणि झाडांची वाढ थांबवतात. जर झाडावर पांढऱ्या कापसासारखे कीटक दिसले, तर ते मीलीबग्स (Mealybugs) असतात आणि हे कीटकही रोपाच्या मुळांना हानी पोहोचवतात आणि रोपं सुकू शकतं. या कीटकांची लवकरात लवकर ओळख करून उपाय केल्यास, तुळशीचे रोप पुन्हा पहिल्यासारखे तरतरी होण्यास मदत मिळते. 

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

दही आणि ताकाचा असा करा वापर... 

दही आणि ताक हे दोन्ही आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ आहेत. या दोघांमध्ये लॅक्टिक ॲसिड व बॅक्टेरिया फार मोठ्या प्रमाणात असतात, ज्याचा आम्लधर्म कीटकांना अजिबात सहन होत नाही. यामुळे दही व ताकातील हे नैसर्गिक घटक कीटकांना दूर ठेवतात आणि त्यांचा नाश करतात. फक्त कीटकच नव्हे, तर दही आणि ताकामध्ये असलेले हे प्रोबायोटिक्स रोपांवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शनलाही आळा घालतात. त्यामुळे रोपांची प्रतिकारशक्ती सुधारते आणि ती अधिक मजबूत होतात.

मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

दही आणि ताक तुळशीच्या रोपासाठी कसे फायदेशीर? 

तुळशीच्या रोपवरील कीटक आणि कीड नष्ट करण्यासाठी, १ चमचा दही किंवा अर्धा कप ताक घ्या ते १ लिटर पाण्यात मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवा. तुमचा घरगुती नैसर्गिक स्प्रे तयार आहे. हा स्प्रे फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच तुळशीच्या रोपावर शिंपडा. शक्यतो रणरणत्या उन्हात स्प्रे करू नका, यामुळे रोपाचे नुकसान होऊ शकते. आठवड्यातून फक्त एकदाच वापरा, यामुळे झाडावरील कीटक कमी होतील आणि नवीन कोवळी पाने येण्यास मदत होईल

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडीपाणी