Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही

जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही

How To Remove Fungus or Bugs From Hibiscus Plant: जास्वंदाच्या फुलावर पांढरा मावा किंवा बुरशीसारखा पदार्थ दिसू लागला असेल तर हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 16:44 IST2025-07-28T16:43:48+5:302025-07-28T16:44:55+5:30

How To Remove Fungus or Bugs From Hibiscus Plant: जास्वंदाच्या फुलावर पांढरा मावा किंवा बुरशीसारखा पदार्थ दिसू लागला असेल तर हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant)

how to remove fungus or bugs from hibiscus plant, best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant, home made insecticide for hibiscus plant | जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही

जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही

Highlights४ ते ५ दिवसातून एकदा हा उपाय करा. रोग निघून जाईल. 

जास्वंदाची वेगवेगळी रोपं अनेक जण आपल्या बाल्कनीमध्ये, अंगणात अगदी हौशीने लावतात. कारण रोजच्या देवपुजेसाठी जास्वंदाच्या फुलांचा वापर होतो. जास्वंदाचं प्रसन्न रंगाचं टप्पोरं फुल पाहिलं की मनही आनंदी होतं. त्यामुळे वेगवेगळ्या  रंगाची जास्वंदाची रोपं आणून लावली जातात. वाढवली जातात. पण बऱ्याचदा त्या रोपावर जर रोग पडला तर मात्र त्याची पानं गळायला सुरुवात होते. तो रोग लवकर आटोक्यात आणला नाही तर मग तो हळूहळू त्या पुर्ण रोपावर तर पसरतोच, पण त्याच्या आजुबाजुची रोपंही खराब करतो (how to remove fungus or bugs from hibiscus plant?). त्यामुळेच जास्वंदाच्या रोपावर रोग पडलेला दिसलाच तर तातडीने हा एक उपाय करा.(best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant)

 

जास्वंदाच्या रोपावर पांढरा रोग किंवा बुरशी पडल्यास काय उपाय करावा?

१. जास्वंदाच्या रोपावर जर बुरशी लागल्यासारखा एखादा पदार्थ दिसलाच तर सगळ्यात आधी त्या संपूर्ण रोपाचं व्यवस्थित निरिक्षण करा

नागपंचमी: पुरणाचे दिंड सैल तर कधी वातड होतात? घ्या सणाचा गोडवा वाढविणारी पारंपरिक रेसिपी

आणि त्यानंतर जिथे जिथे बुरशी लागलेली आहे ती पानं, देठं पुर्णपणे कापून टाका. बऱ्याचदा असंही होतं की पानाच्या खालच्या बाजुने रोग पडलेला असताे, पण आपल्याला तो दिसत नाही. त्यामुळे रोपाचं, प्रत्येक पानाचं अगदी बारकाईने निरिक्षण करून रोपाची छटाई करावी.

 

२. त्यानंतर आता घरच्याघरी किटकनाशक औषध कसं तयार करायचं ते पाहा.. यासाठी ५० ग्रॅम तंबाखू जवळपास १ लीटर पाण्यात भिजत घाला. साधारण दोन दिवस तंबाखू घातलेले पाणी तसेच झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

त्या पाण्यामध्ये ४ ते ५ चमचे अगदी आंबट झालेलं ताक घाला. ताक आणि तंबाखूचे पाणी दोन्ही व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ते स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ते संपूर्ण रोपावर शिंपडा. तसेच काही पाणी कुंडीमधल्या मातीमध्येही घाला. ४ ते ५ दिवसातून एकदा हा उपाय करा. रोग निघून जाईल. 

 

Web Title: how to remove fungus or bugs from hibiscus plant, best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant, home made insecticide for hibiscus plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.