Lokmat Sakhi >Gardening > तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

Gardening Tips For The Fast Growth Of Tulsi Plant: तुळशीचं रोप नव्याने लावत असाल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी येतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 16:31 IST2025-07-02T16:24:34+5:302025-07-02T16:31:02+5:30

Gardening Tips For The Fast Growth Of Tulsi Plant: तुळशीचं रोप नव्याने लावत असाल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी येतील.

how to plant tulsi, repotting tips for tulsi plant, gardening tips for the fast growth of tulsi plant | तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

Highlightsतुळशीच्या राेपाला खूप पाणी देऊ नये. दररोज माती ओलसर राहील एवढं पाणी तिला पुरेसं असतं. 

तुळस या रोपाला धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे. शिवाय तिचे आरोग्यदायी फायदेही आहेतच. त्यामुळे ज्यांना गार्डनिंगची अजिबातच आवड नसते किंवा ज्यांच्याकडे खूप झाडं किंवा झाडांसाठी जागाही नसते अशा घरातही तुळशीचं एखादं रोप तरी हमखास असतंच. पण सगळ्याच घरांमधल्या तुळस छान बहरलेल्या नसतात. अनेकदा तर तुळशीच्या रोपांना पानांपेक्षा काड्याच जास्त दिसतात. असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ते आता पाहूया... सध्या पावसाळा आहेच. त्यामुळेच जर तुळशीचं रोपं नव्याने खरेदी करून लावणार असाल तर ते लावताना पुढील गोष्टी नक्की करा..(Gardening Tips For The Fast Growth Of Tulsi Plant)

 

तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी टिप्स..

१. तुळशीचं रोप नर्सरीतून खरेदी करून आणणार असाल तर नेहमी असं रोप घ्यावं जे बहरलेलं असतं. रोपाची पानं नीट तपासून घ्यावीत. कधी कधी पानांवर रोग पडलेला असतो. ते आपण काळजीपुर्वक पाहिलं नाही तर मग रोप घरी आणताच खराब होतं. 

सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं..

२. तुळशीला खूप चिकट माती नको असते. त्यामुळे तुम्ही तुळशीसाठी जेव्हा कुंडीमध्ये माती टाकाल तेव्हा ती ५० टक्के माती, २५ टक्के कोकोपीट आणि २५ टक्के शेणखत या प्रमाणात भरा. 

 

३. नर्सरीतून आणलेलं रोप जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या मोठ्या कुंडीमध्ये लावाल तेव्हा ते रोप जसंच्यातसं उचलून कुंडीमध्ये टाका. त्यानंतर त्याच्या आजुबाजुने माती घालावी. रोप लावतान त्याच्या मुळांना धक्का लागू देऊ नका.

घरोघर मुलं चिडकी! किरकोळ गोष्टींवरुन मुलं चिडतात, आदळआपट करतात-किंचाळतात! पाहा काय चुकतंय..

४. कुंडीमध्ये खूप जास्त माती भरू नये. एक ते दिड इंच जागा रिकामी राहील एवढीच माती भरावी. जेणेकरून पाणी दिल्यावर ते मातीमध्ये व्यवस्थित मुरेल, वाहून जाणार नाही.

५. तुळशीच्या राेपाला खूप पाणी देऊ नये. दररोज माती ओलसर राहील एवढं पाणी तिला पुरेसं असतं. 


 

 

Web Title: how to plant tulsi, repotting tips for tulsi plant, gardening tips for the fast growth of tulsi plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.