Join us

झाड खूप मोठे पण लिंबू लागत नाहीत? पाण्यात मिसळा एक पिवळा पदार्थ, येतील भरपूर लिंबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2024 10:25 IST

How to Plant, Grow & Care for Lemon Tree : रोपट्याला पानं कमी पण लिंबूच-लिंबू जास्त दिसतील, फक्त काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा..

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार घरात बाग (Gardening Tips) तयार करतात. त्या बागेत गुलाब, मोगरा, तुळस यासह इतर रोपटे लावतात. काही जण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लिंबाचे देखील रोपटे लावतात. पण लिंबाचे रोपटे बरेच जण लावणं टाळतात. कारण बहुतांश रोपट्यांना लिंबू लागत नाही. शिवाय रोपटे लावल्यानंतर लगेच सुकतात. कधी-कधी मार्केटमध्ये लिंबू स्वस्त दरात मिळतात, किंवा महाग मिळतात. त्यामुळे बहुतांश जण घरातच लिंबाचे रोपटे लावतात.

पण लिंबाचे रोपटे लावताना अशा काही चुका होतात, ज्यामुळे रोपटे पानांनी बहरते, पण त्याला लिंबू लागत नाही. अशावेळी लिंबाच्या रोपट्याला भरपूर लिंबू लागावे, यासाठी काय करावे? असा प्रश्न निर्माण होतो (Lemon Tree). कुंडीतल्या रोपट्याला जास्त लिंबू लागावे असे वाटत असेल तर, रोपटे लावताना एक गोष्ट मातीत मिसळा. यामुळे रोपटे पानांनी कमी पण लिंबूने जास्त बहरेल(How to Plant, Grow & Care for Lemon Tree).

लिंबाचे रोपटे लावताना लक्षात ठेवाव्यात अशा काही टिप्स

- लिंबाचे रोपटे नेहमी सूर्यप्रकाशाजवळ ठेवावे. सूर्यप्रकाशामुळे लिंबाचे रोपटे पानांनी कमी, लिंबूने अधिक बहरेल.

जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप

- कुंडीत लिंबाचे रोपटे लावताना, कुंडीच्याखाली छिद्र असेल याची खात्री करून घ्या. यामुळे कुंडीत जास्त पाणी जमा होणार नाही. ज्यामुळे लिंबाच्या झाडांची मुळं कुजणार नाहीत.

- लिंबाचे झाड लावताना फ्रेश मातीचा वापर करा. शिवाय त्यात खत घालायला विसरू नका. उत्तम खतामुळे लिंबाचे रोपटे चांगले वाढेल.

- जोपर्यंत कुंडीतलं पाणी माती शोषून घेत नाही, किंवा माती पूर्णपणे कोरडी होत नाही, तेव्हाच कुंडीत पाणी घाला. ओलसर मातीत पाणी घातल्यास रोपट्याची पाने पिवळी पडू लागतात.

तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..

- जर पाणी आणि खत घालूनही रोपट्याला लिंबू लागत नसतील तर, रोपट्याला पाणी घालताना त्यात कच्च्या हळदीची पावडर घालून मिक्स करा. कच्च्या हळदीच्या पाण्यामुळे रोपट्याला भरपूर लिंबू लागतील. शिवाय रोपट्याला कीटकांचा देखील त्रास होणार नाही.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल