Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारिजातकाचा पडेल अंगणात सडा-झाडाला ‘हे’ घरगुती खत घाला-केळीचा अगदी सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:34 IST

How To Plant Banana Peel Bio Enzyme For Night Flower Jasmin : कचऱ्यात फेकली जाणारी केळीची सालं या फुलांच्या रोपासाठी तुम्ही खत म्हणून वापरू शकता.

पारिजातकाची फुलं केवळ आपल्या सुगंधासाठीच नाही तर धार्मिकदृष्ट्याही महत्वाची मानली जातात. आयुर्वेदात या फुलांचे महत्वाचे स्थान आहे. लोकांची तक्रार असते की रोपाची वाढ तर होतेय पण फुलं येत नाहीत. कचऱ्यात फेकली जाणारी केळीची सालं या फुलांच्या रोपासाठी तुम्ही खत म्हणून वापरू शकता ज्यामुळे रोपाची वाढ चांगली होईल. (How To Plant Banana Peel Bio Enzyme For Night Flower)

गार्डनिंग एक्सपर्ट सविता यांच्यामते पारिजातकाची फुलं येण्यासाठी कोणत्याही महागड्या केमकल्सची आवश्यकता नाही. केळ्याच्या सालीचा वापर करून तुम्ही बायो एंजाईम्सयुक्त खत रोपासाठी तयार करू शकता. हे पूर्णपणे नैसर्गिक असून पोटॅशियमनं परिपूर्ण असते. जे रोपात घातल्यानंतर फुलं येण्यास मदत होते.

कोणतंही रोप बहरण्यासाठी प्रनिंग खूपच गरजेचं असतं. या रोपाची कापणी हिवाळ्यानंतर करावीच लागते. रोपातील जुन्या, सुकलेल्या फांद्या काढून टाका. प्रुनिंगच्या एक आठवड्यानंतर रोपाच्या मुळांजवळ  घातलेली माती हलकीशी खोदून घ्या. नंतर त्यावरची जुनी माती काढून नवीन माती घाला.

पोटॅशियम रिच बनाना पील एंजाईम

 फुलांसाठीचे पोटॅशियम हे खूपच पोषक तत्व असते. केळ्याच्या  साली पोटॅशियमचा एक चांगला, प्राकृतीक स्त्रोत आहेत. बायो एंजाईम्स तयार करण्यासाठी एक प्लास्टीकची बाटली घ्या. यात पाणी भरा. नंतर यात भरपूर  केळ्याची सालं घाला नंतर गूळसुद्धा घाला नंतर बाटलीचं झाकण पूर्णपणे बंद करा. त्यात छोटं छिद्र तयार  करा जेणेकरून गॅस व्यवस्थित बाहेर निघेल. छिद्र केलं नसेल तर रोज झाकण थोडं सैल करा आणि बॉटल हलवून घ्या.

एंजाईम्स तयार व्हायला वेळ द्या

बॉटल कोणत्याही सावलीच्या ठिकाणी ठेवा. बायो एंजाईम्स तयार व्हायला वेळ लागतो. हिवाळ्यात 3 ते 4 महिने लागू शकतात. तर उन्हाळ्यात दीड महिन्यात तयार होतो. हे एंजाईन्स तयार होतील तेव्हा केळीची सालं पूर्णपणे गळतील आणि पाण्याचा रंग गडद दिसेल.

खत देण्याआधी माती तयार करा

एंजाईम्स तयार झाल्यानंतर हे खत रोपाला देण्याच्या 1 दिवस आधी पाणी देऊ नका. माती पूर्ण सुकल्यानंतर माती खोदून मग खत खाला. जेणेकरून हवा आणि खत सहज रोपाला मिळेल. हे एक लिक्वीड फर्टिलायजर आहे. ज्याचा वापर सावधगिरीनं करावा. 1 लिटर साध्या पाण्यात पाण्याचा रंग बदलेल इतकेच एंजाईम्स मिसळा. जास्त खत घातल्यानं रोप मरू शकतं. खत घातल्यानंतर रोपाला उन्हात ठेवा. या रोपाला जास्त पाणी देऊ नका. जेव्हा माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी द्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Get abundant Parijat flowers with this homemade banana peel fertilizer.

Web Summary : For abundant Parijat blooms, use homemade banana peel fertilizer rich in potassium. Prune after winter, refresh the soil. Create bio-enzymes with banana peels, jaggery, and water. Dilute enzyme solution before applying; avoid overwatering the plant.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स