गुलाबाचे नाव ऐकताच डोळ्यासमोर रंगेबिरंगी सुंदर गुलाबाची रोपं येतात. बरेचजण बाल्कनीत, गार्डनमध्ये गुलाबाचे रोप लावतात पण व्यवस्थित काळजी घेऊनही अनेकदा गुलाबाच्या रोपाला खूप चांगली फुलंच येत नाहीत अशी बऱ्याच जणांची तक्रार असते (How To Use Epsom Salt For Rose Plant). गुलाबाचं रोप चांगलं बहरण्यासाठी तुम्ही या रोपाला घरगुती खत देऊ शकता. बाजारातील केमिकल्सयुक्त खतांपेक्षा स्वयंपाकघरातील काही पदार्थ रोपांसाठी फायदेशीर ठरतात. (How To Make Rose Plant Bloom Using Epsom Salt) कोणकोणते पदार्थ गुलाबाच्या रोपासाठी फायदेशीर ठरतात पाहूया.
चहा पावडरचं पाणी
रात्रभर १ ग्लास पाण्यात १ चमचा वापरलेली चहा पावडर भिजवून ठेवा. सकाळी गाळून ही पावडर रोपांच्या मुळांमध्ये घाला. चहा पावडरमध्ये असलेले मिनरल्स मातीची ताकद वाढवतात ज्यामुळे फुल फुलण्याची प्रक्रिया वेगानं होते.
बटाट्याचं पाणी
एक मध्यम आकाराच बटाटा घेऊन तो छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. यात थोडं पाणी घालून मिक्सरमधून पाणी वाटून घ्या. नंतर यात २ लिटर पाणी मिसळा आणि गाळून रोपांच्या मुळांमध्ये घाला. यातील स्टार्च आणि मिनरल्स रोपाच्या वाढीत मदत करतात.
पाणी देण्याची योग्य पद्धत
गुलाबाच्या रोपाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा पाणी देणं योग्य ठरतं. मातीमध्ये जास्त मॉईश्चर राहायला नको अन्यथा मूळं सडू शकतात.
एप्सम सॉल्ट घाला
गार्डनिंग नो हाऊच्या रिपोर्टनुसार गुलाबासाठी हे एक उत्तम खत आहे. हे खत पांढर्या क्रिस्टल्सच्या स्वरूपात असते. १ लिटर पाण्यात १ ग्रॅम एप्सम सॉल्ट घालून १५ दिवसांतून एकदा फुलांना हे खत द्या. ज्यामुळे भरपूर फुलं येतील आणि पानं हिरवीगार राहण्यास मदत होईल. या उपायामुळे फुलांचा रंग अधिक गडद होण्यास ,पानं अधिक बहरण्यास मदत होते.
याशिवाय गुलाबाच्या फुलाला कमीत कमी ५ ते ६ तास उन्हात ठेवायला हवं. जर रोप सावलीत राहिले तर फुलं व्यवस्थित येणार नाहीत. रासायनिक खतांऐवजी चहा पावडर, कॉफी पावडर आणि बटाट्याचा रस या प्रकारची नॅच्युरल खतं मातीला ताकद देतात ज्यामुळे रोपं चांगली राहण्यासही मदत होते.
