Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज पाणी घालता तरी फुलंच येत नाही? कुंडीत 'हा' पांढरा पदार्थ कालवा, भराभर येतील गुलाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:54 IST

How To Make Rose Plant Bloom : तुरटीतील एल्युमिनियीम, पोटॅशियम सल्फेट, रोपांना मुळापासून मजबूत बनवते. तसंच किटक,बुरशी येण्याची समस्याही उद्भवत नाही.

हिवाळ्याच्या (Winter Tips) दिवसांत गुलाबाच्या रोपाला फुलं येत नसतील तर अनेकांची निराशा होते. अनेकदा असं पाहिलं जातं की, रोप बहरलेलं दिसतं पण कळ्याच येत नाहीत. काही सोपे उपाय करून तुम्ही गुलाबाच्या रोपाला फुलं येण्यासाठी प्रयत्न करू शकता. हे काम करण्यासाठी तुम्हाला 5 ते 10 रूपयांची तुरटी लागेल. (How To Make Rose Plant Bloom)

तुरटीतील एल्युमिनियीम, पोटॅशियम सल्फेट, रोपांना मुळापासून मजबूत बनवते. तसंच किटक,बुरशी येण्याची समस्याही उद्भवत नाही. तुरटीचा वापर करणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला महागडी रसायनं लागत नाहीत. फक्त योग्य पद्धतीनं वापर करायला हवा. याशिवाय योग्य प्रमाणात ऊन दाखवावं, पाणी घालावं तसंच वेळोवेळी छाटणी करणंही महत्त्वाचं आहे या उपायांनी गुलाबाचे फुल बहरलेलं राहण्यास मदत होईल. (Add These White Thing In Soil To Make Rose Plant Bloom)

तुरटीचा वापर

तुरटी मातीतील हानीकारक किटक, फंगस दूर करण्यास मदत करते. जेव्हा मुळं हेल्दी राहतात तेव्हा याचा परिणाम सरळ फुलांवर होतो. तुरटीचं पाणी तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात तुरटी मिसळा नंतर त्यात छोटे तुकडे घालून व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्या. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही  तुरटीचं पाणी घालण्याआधी माती व्यवस्थित सुकवून खोदून घ्या.

जर तुम्हाला तुरटीचं हे द्रावण तयार करण्यात वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही थेट तुरटीचे छोटे छोटे खडे मातीत मिसळू शकता. फक्त याचं प्रमाण कमी असायला हवं. तुरटीमुळे मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही त्यामुळे रोप निरोगी राहतं.

थंडीत गुलाबाच्या रोपाला फुलं येण्यासाठी काय करावं?

गुलाबाच्या रोपाला कमीत कमी ५ ते ६ तास उन्हाची गरज असते. थंडीच्या दिवसांत गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यानं गुलाबाच्या मुळांना नुकसान पोहोचू शकतं. वरची माती सुकल्यानंतर पाणी द्या. हिवाळ्यात सुकलेल्या फांद्या कापून टाका. ज्यामुळे नवीन फांद्या येतात तसंच फुलं जास्त दिसून येतात.

 

ब्लाऊजला फॅन्सी लूक देणारे मागच्या गळ्याचे १० लेटेस्ट डिझाईन्स; साडीत स्टायलिश दिसाल

मोहोरीच्या फांद्या, वर्मी कम्पोस्ट, शेण खत गुलाबासाठी फायेशीर ठरते. १५ ते २० दिवसांत एकदा खत द्यायला हवं. महिन्यातून एकदा तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. ज्यामुळे मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तुरटीचा वापर करून तुम्ही  गुलाबाच्या रोपाला सुंदर बनवू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Roses not blooming? Add this white ingredient for abundant flowers.

Web Summary : Struggling with rose blooms? Turti (alum) strengthens roots, prevents pests, and improves soil. Use it as a diluted water solution or mix small pieces directly into the soil. Ensure adequate sunlight, proper watering, and pruning for healthy, blooming roses.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स