Join us

हिरव्यागार पानांचा घनदाट मनी प्लांट घरी हवा? पाहा पाणी घालण्याची योग्य पद्धत, मनी प्लांट वाढेल भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 09:50 IST

how to make money plant grow faster : tips to grow money plant tall and healthy : best fertilizer for money plant growth : watering tips for money plant : money plant care guide for fast growth : मनी प्लांटच्या रोपाची वाढ व्हावी, पानं भरगच्च दिसावीत म्हणून 'या' खास ट्रिकने घाला पाणी...

मनी प्लांटचे सुंदर रोप आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच गार्डन किंवा बाल्कनीमध्ये असते. मनी प्लांटचा वेल किंवा रोप अशा दोन्ही प्रकारात आपण लावू शकतो. मनी प्लांटची (tips to grow money plant tall and healthy) पाने छान हिरवीगार आणि भरगच्च दिसत असतील तरच हे रोप दिसायला सुंदर दिसते. घरात मनी प्लांट लावताना आपण त्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात कोणतीही (how to make money plant grow faster) कमी करत नाही. परंतु अनेकजणांची (watering tips for money plant) अशी तक्रार असते की, मनी प्लांटचे रोप लावून देखील त्याची वाढ हवी तशी होत नाही, पाने पिवळी पडतात, रोप - वेल कोमेजून जाते(money plant care guide for fast growth).

मनी प्लांटच्या रोपाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी तसेच पानांना हिरवागार बहर येण्यासाठी रोपाला पाणी घालण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर मनी प्लांट उंच, दाट आणि वेगाने वाढणारा हवा असेल, तर त्याला पाणी देण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहित असणे आवश्यक असते. कारण, असे न केल्यास झाडाची पाने पिवळी पडू शकतात आणि त्याच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.

१. मनी प्लांटच्या रोपाला रोज पाणी देणे आवश्यक आहे का ? 

मनी प्लांटला रोज पाणी देण्याची गरज नाही. मनी प्लांट हे एक असे रोप आहे, जे काही दिवस पाणी नसले तरी खराब होत नाही. या रोपाला तेव्हाच पाणी द्यावे जेव्हा मातीचा वरचा थर पूर्णपणे कोरडा होईल. पावसाळ्याच्या दिवसात ७ ते १० दिवसांत एकदाच पाणी देणे पुरेसे असते. तर उन्हाळ्यात या रोपाला २ ते ३ वेळा पाणी घालू शकता. या रोपाला तेव्हाच पाणी द्यावे जेव्हा माती सुमारे ७५ टक्के कोरडी होईल. याव्यतिरिक्त, मनी प्लांट लावताना कुंडीत पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असल्याची खात्री करा, जेणेकरून अतिरिक्त पाणी कुंडीत साठणार नाही.

डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

२. मनी प्लांटला उंच आणि दाट कसे बनवायचे ?

१. जर तुम्ही मनी प्लांट कुंडीत लावला असेल तर त्याला वेळोवेळी पाणी द्या.

२. मनी प्लांटला थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका, यामुळे तो जळून जाऊ शकतो.

३. झाडाची पाने पिवळी पडल्यास किंवा खराब झाल्यास त्याची छाटणी करत राहा.

४. जर तुम्ही मनी प्लांट जमिनीत लावला असेल, तर त्याला वेळोवेळी खत द्या.

निर्माल्यातील झेंडूची फुलं फेकू नका, त्यातूनच उगवतील नवी झेंडूची रोपं-‘असं’ करा झटपट बागकाम...

३. चहा पावडरचा वापर करा... 

मनी प्लांटच्या रोपाला दाट बनवण्यासाठी तुम्ही चहा पावडरचा वापर करू शकता. यासाठी चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पावडर पाण्याने धुऊन टाका, जेणेकरून त्यातील दूध आणि साखर निघून जाईल. नंतर ती उन्हात वाळवा. वाळल्यावर ही चहा पावडर मातीत मिसळा. यामुळे रोपाची वाढ चांगली होईल.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी