Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनी प्लांटची वाढ होईल 'सुपरफास्ट'! मुळाशी घाला ५ गोष्टी - हिरवागार, लांबसडक वेल दिसेल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 10:05 IST

how to make money plant bushy : how to grow money plant faster : natural fertilizer for money plant : मुळांपासून मोठ्या पानांपर्यंत, मनी प्लांट भराभर वाढण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी फायदेशीर...

हिरवागार आणि आकर्षक दिसणाऱ्या मनी प्लांटची सुंदर वेल ही जवळपास प्रत्येकाच्या घरात असतेच. घराच्या कोपऱ्यात किंवा खिडकीपाशी लावलेला तो छोटासा, हिरवागार 'मनी प्लांट' केवळ घराची शोभाच वाढवत नाही, तर मनाला एक वेगळीच शांतता देतो. अनेकजण मोठ्या हौसेन आणि आवडीने मनी प्लांटचा वेल लावतात. मनी प्लांट दिसायला जितका साधा वाटतो, तितकीच त्याची योग्य निगा राखणे देखील महत्त्वाचे असते(how to make money plant bushy).

बऱ्याचदा आपण फक्त पाणी घालतो आणि खत देतो, तरीही हवी तशी वेलीची वाढ काही होत नाही... इतकंच नाही तर, अनेकदा योग्य काळजी न घेतल्यामुळे मनी प्लांटची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात किंवा गळू लागतात आणि आपली सगळी मेहनत वाया गेल्यासारखं वाटतं...याचे मुख्य कारण म्हणजे मातीतील पोषक तत्वांची कमतरता...तुमच्या मनी प्लांटला जर नर्सरीसारख दाट आणि गडद हिरवागार करायच असेल, तर केवळ खतांवर अवलंबून राहून (how to grow money plant faster) चालणार नाही. नैसर्गिकरित्या मातीचा कस वाढवणारे असे ५ पदार्थ आपल्या किचनमध्येच उपलब्ध असतात, जे मातीत मिसळल्यास मनी प्लांट झपाट्याने वाढू लागेल. महागडी खतं आणण्यापेक्षा जर तुम्ही मातीत साधे ५ पदार्थ योग्य पद्धतीने मिसळले, तर तुमचा मनी प्लांट अवघ्या काही दिवसांतच घनदाट आणि हिरवागार दिसायला लागेल.  मुळांपासून मोठ्या पानांपर्यंत, मनी प्लांटचा कायापालट करणाऱ्या या ५ गोष्टी नेमक्या (natural fertilizer for money plant) कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा ते पाहूयात... 

मनी प्लांट झपाट्याने वाढवण्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय... 

तुमचा मनी प्लांट जर वाढत नसेल, तर मातीत खतासोबतच खालील ५ नैसर्गिक घटक मिसळल्यास त्याची वाढ 'सुपरफास्ट' होईल. 

१. कॉफीचे पाणी (Coffee Grounds) :- मनी प्लांटच्या उत्तम वाढीसाठी कॉफी पावडर अतिशय गुणकारी आहे. कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे रोपाची वाढ वेगाने करण्यास मदत करतात. १ लिटर पाण्यात १ चमचा कॉफी पावडर मिसळून ते पाणी झाडाच्या मुळाशी घाला. दर १० ते १५ दिवसांतून एकदा हा केल्यास वेल ताजीतवानी हिरवीगार दिसेल.

उन्हाळ्यात दह्यात मीठ घालून खावं की दहीसाखर खाणंच फायद्याचं? पाहा शरीरासाठी काय फायद्याचं...

२. खायचा सोडा (Baking Soda) :- खाण्याच्या सोड्याचे पाणी वेलींच्या मुळांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे वेलींची वाढ होण्यास मदत होते. १ मगभर पाण्यात १ चमचा खाण्याचा सोडा नीट विरघळवून घ्या आणि हे मिश्रण मनी प्लांटच्या मुळाशी घाला. काही दिवसांतच तुम्हाला वेलीच्या वाढीत फरक दिसून येईल. 

३. हळद (Turmeric) :- काहीवेळा वेलेली बुरशी लागल्यामुळे त्याची वाढ खुंटते. हळदीमधील नैसर्गिक घटक बुरशी नष्ट करण्याचे काम करतात. कुंडीतील मातीत किंवा पाण्यात थोडी हळद मिसळून ती मातीत मिसळा. यामुळे वेलीचे बुरशीपासून संरक्षण होईल आणि वेल वेगाने वाढू लागेल.

तिशी ओलांडताच भारतीय स्त्री-पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट- लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

४. एप्सम सॉल्ट (Epsom Salt) :- वेलीच्या वाढीसाठी एप्सम सॉल्ट हे एक उत्तम 'बूस्टर' मानले जाते, यामुळे पाने जास्त हिरवीगार होतात. पाण्यात थोडे एप्सम सॉल्ट मिक्स करून ते मुळाशी घाला. सोबतच मातीची थोडी खुरपणी करून त्यात 'वर्मीकंपोस्ट' (गांडूळ खत) घातल्यास वाढीला अधिक गती मिळते.

५. चहा पावडरचे पाणी (Tea Leaves) :- वापरलेली किंवा ताजी चहा पावडर मनी प्लांटसाठी उत्कृष्ट जैविक खत म्हणून काम करते. वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून मातीत मिसळा किंवा चहा पावडरचे पाणी वेलीला द्या. यामुळे वेलीला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि मनी प्लांट लवकर घनदाट व हिरवागार होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Grow Money Plant Faster: 5 Kitchen Ingredients for Lush Greenery

Web Summary : Want a thriving money plant? Add coffee, baking soda, turmeric, Epsom salt, or tea leaves to the soil. These natural ingredients boost growth, creating a lush, green vine quickly and easily.
टॅग्स :बागकाम टिप्सपाणीइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी