Join us
Daily Top 2Weekly Top 5

किचनमधला कचरा आणि चमचाभर गूळ.. रोपांसाठी उत्कृष्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत, फुलं येतील भरपूर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 16:06 IST

Gardening Tips: स्वयंपाक घरात तयार होणारा ओला कचरा एकत्र करून रोपांसाठी उत्तम दर्जाचं घरगुती खत कसं तयार करायचं याविषयीची ही खास माहिती..(how to make liquid fertilizer using jaggery and kitchen waste?)

ठळक मुद्देआठवड्यातून एकदा हा उपाय करा. रोपांना खूप फुलं येतील आणि रोपांची वाढही जोमाने होईल. 

बऱ्याचदा असं होतं की आपण मोठ्या हौशीने आपल्या घराभाेवती वेगवेगळी रोपं लावतो. अगदी फ्लॅटमध्ये राहात असलो तरी बाल्कन्यांमध्ये कित्येक रोपं लावून त्या सजवून टाकतो. पण कधी कधी हौशीने लावलेल्या त्या सुंदर रोपांची चांगली वाढ होतच नाही. किंवा आवर्जून एखादं फुलझाड आणलेलं असतं पण त्याला फुलंच येत नाहीत. अशी अवस्था जर तुमच्या बागेची झाली असेल तर हा अगदी बिनपैशाचा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा गूळ आणि स्वयंपाक घरात तयार झालेला ओला कचरा वापरायचा आहे (how to use kitchen waste for plant growth and flowering plants?). या सगळ्या गोष्टींचा वापर करून रोपांसाठी घरगुती खत कसं तयार करायचं आणि ते रोपांना कसं घालायचं ते पाहूया..(how to make liquid fertilizer using jaggery and kitchen waste?)

 

रोपांसाठी घरच्याघरी लिक्विड खत कसं तयार करायचं?

सध्या संत्रीचा हंगाम आहे. संत्री जशी आरोग्यवर्धक आहे, तशीच ती केेसांसाठी आणि त्वचेसाठीही चांगली असते, हे आपल्याला ठाऊक आहे. पण आता त्याच संत्रीचा उपयोग आपल्या रोपांसाठी कसा करून घ्यायचा ते पाहा. कारण संत्रीच्या सालांमध्ये असणारे काही घटक रोपांच्या वाढीसाठीही खूप फायदेशीर ठरतात. तर सगळ्यात आधी २ ते ३ संत्रीची सालं जमा करा आणि ते बारीक बारीक कापून घ्या.

अंगावरून खूप पांढरं जातं? वाटीभर तांदळाचा सोपा घरगुती आयुर्वेदिक उपाय- व्हाईट डिस्चार्ज थांबेल

आता लिंबू पिळून झाल्यानंतर त्याचा उरलेला भाग आपण टाकून देतो. पण तो फेकून न देता त्याचेही छोटे छोटे काप करा. यानंतर केळीची २ ते ३ सालं घ्या आणि त्यांचेही बारीक तुकडे करा. केळीमध्ये असणारे पोटॅशियम फुलझाडांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. 

 

आता ही सगळी बारीक चिरलेली सालं एका बादलीमध्ये घाला. त्यामध्ये २ चमचे गूळ घाला. आणि ही सगळी सालं व्यवस्थित बुडतील एवढं पाणी त्यात घाला. आता बादलीवर झाकण ठेवून ती २ दिवस उन्हामध्ये ठेवून द्या.

तुम्हीही आलं- लसूण एकत्र वाटून पदार्थांमध्ये घालता? 'ही' चूक केल्याने काय नुकसान होतं ते वाचाच..

तिसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या आणि हे पाणी थोडं थोडं करून फुलझाडांना तसेच इतर रोपांनाही द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. रोपांना खूप फुलं येतील आणि रोपांची वाढही जोमाने होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kitchen Waste & Jaggery: Easy Plant Fertilizer for Abundant Blooms

Web Summary : Transform kitchen waste into potent plant fertilizer. Use citrus peels, banana peels, and jaggery. Soak for two days, strain, and apply to plants weekly for enhanced growth and abundant flowering. It's a cost-effective, eco-friendly gardening solution.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेकेळीफुलं