घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा खिडकीत लावलेली कुंडीतील रोपे घराचे सौंदर्य वाढवतात. आपल्यापैकी बरेचजण मोठ्या हौसेनं घरात वेगवेगळ्या प्रकारची रोपं, झाडं लावतात पण अनेकदा योग्य पोषण न मिळाल्यामुळे त्यांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात किंवा फुलंही नीट येत नाहीत. कित्येकदा रोपांची योग्य ती काळजी घेऊन देखील त्यांची वाढ किंवा फळ - फुल येण्याचे प्रमाण आपल्याला पाहिजे तितके नसते, अशावेळी साऱ्या मेहेनतीवर पाणी फिरवल्यासारखेच वाटते(how to make fertilizer from banana peels at home).
अशा परिस्थितीत, रोपांसाठी महागडी खतं वापरण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक उपायांचा वापर केला तर रोपांची वाढ अधिक चांगली होऊ शकते. त्यापैकीच एक असरदार आणि सोपा उपाय म्हणजे केळ्याची साल. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, जे रोपांच्या मुळांना बळकटी देऊन झाडांची वाढ, आणि फळं - फुल येण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. कुंडीतील रोपांसाठी केळ्याच्या सालीचा योग्य पद्धतीने (banana peel fertilizer for plants growth) कसा उपयोग करायचा आणि त्याचे (homemade banana peel fertilizer) फायदे काय आहेत, ते पाहूयात...
१. केळीच्या सालीचे लिक्विड फर्टिलायझर :- रोपांना त्वरित पोषण देण्यासाठी केळीच्या सालीचे 'लिक्विड फर्टिलायझर' वापरणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सर्वातआधी केळीच्या ताज्या साली घ्या आणि त्यांचे बारीक तुकडे करा.आता हे तुकडे एका काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बादलीत टाका. त्यानंतर त्यात पूर्णपणे पाणी भरा. सालींचे तुकडे लहान असल्याने त्यातील पोषक तत्वे पाण्यात सहजपणे विरघळण्यास मदत होते. साली घातलेल्या पाण्याचे भांडे एखाद्या सावलीच्या ठिकाणी तीन दिवसांसाठी झाकून ठेवा. या तीन दिवसांत साली पाण्यात विरघळू लागतात आणि आपली सर्व सूक्ष्म पोषक तत्वे पाण्यात सोडतात. खत व्यवस्थित तयार व्हावे यासाठी मध्ये-मध्ये हे द्रावण एखाद्या लाकडाच्या काठीने हलवत राहा. तीन दिवसांनंतर पाण्याचा रंग गडद तपकिरी होईल. आता हे द्रावण एका बारीक गाळणीने गाळून घ्या. तयार झालेले द्रावण थेट रोपाला घालू नका. यामध्ये समान प्रमाणात साधे पाणी मिसळा आणि त्यानंतरच सर्व प्रकारच्या इनडोअर आणि आउटडोअर रोपांच्या मुळाशी हे लिक्विड फर्टिलायझर घाला. हे खत फुलांना बहरण्यासाठी खूप मदत करते.
तूप खाणं सोडलंय? लठ्ठ असाल तरीही रोज खा 'इतके' चमचे तूप; हृदयविकाराचा धोका टळून होईल वेटलॉसही...
२. केळीच्या सालीचा असा करा वापर :- जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर केळीच्या सालींचे तुकडे करून तुम्ही ते थेट कुंडीतील मातीत टाकू शकता. यासाठी कुंडीतील वरची थोडी माती बाजूला करा आणि तिथे हे सालींचे तुकडे वरचेवर अलगद मातीत रोवून घ्या. हळूहळू या साली काळ्या पडतील आणि मातीतच विरघळून जातील. मातीचा पोत सुधारण्यासाठी आणि त्यातील 'ह्युमस'चे (Humus) प्रमाण वाढवण्यासाठी ही पद्धत अतिशय फायदेशीर ठरते.
३. ऊन्हांत वाळवून पावडर करा :- केळीच्या साली दीर्घकाळ वापरता याव्यात यासाठी त्या ऊन्हांत वाळवून ठेवणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. केळीच्या साली कडक उन्हात तोपर्यंत वाळवा जोपर्यंत त्या पूर्णपणे काळ्या आणि कडक होत नाहीत. पूर्ण वाळल्यानंतर या साली मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून घ्या. नंतर ही पावडर बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावी. ही पावडर तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून अनेक महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकता. पावडर खताचा वापर करण्यासाठी सर्वात आधी कुंडीतील वरची माती हलकेच मोकळी करून घ्या. आता एक-दोन चमचे केळीच्या सालीची पावडर रोपाच्या बाजूने शिंपडा आणि पुन्हा माती होती तशीच झाकून ठेवा.
अशाप्रकारे आपण केळीच्या साली फेकून न देता त्याचे ३ वेगवेगळ्या पद्धतीने खतं तयार करुन रोपांसाठी वापरु शकता.
