ब्रह्मकमळाला देवाच फूल असंही म्हटलं जातं. ब्रह्मकमळाचे झाड घरात असणं म्हणजे जणू शुभतेचं प्रतीक. या फुलाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे अनेकजण आपल्या घरात, अंगणात लावतात.(Brahma Kamal plant care) आपल्यापैकी अनेकांच्या घरात किंवा बाल्कनीत छोटसं गार्डन पाहायला मिळतं.(Brahma Kamal soil mix) त्यात विविध रोपही लावलेली असतात.(Brahma Kamal blooming tips) पण ब्रह्मकमळाच्या रोपाच तसं नाही. हे पानांपासून तयार होणार रोप आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने लावणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं.
या रोपाच वैशिष्ट्य असं की ते फक्त रात्री उमलतं आणि पहाटेच्यावेळी कोमजते.(Brahma Kamal fertilizer) अनेकदा आपण हे रोप घरात लावण्याचा प्रयत्न करतो पण योग्य ती काळजी न घेतल्याने रोप वाढत नाही. अशावेळी कुंडीतल्या मातीत २ पदार्थ मिसळल्यास रोप बहरेल आणि सुकणार देखील नाही. (Potting mix for Brahma Kamal)
कढीपत्त्याचे रोप वाढेल भरभर, येतील हिरवीगार पानं- हिवाळ्यात फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या
ब्रह्मकमळाचे रोप हे उष्णकटीबंध किंवा कोरड्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते. या रोपाला घरात लावण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला योग्य माती आणि कुंडीची निवड करावी लागेल. त्यासाठी माती पाण्यासाठी अनुकूल असायला हवी. वाळू, कंपोस्ट आणि कोकोपीट यांचे मिश्रण वापरा. सुरुवातीला कुंडी छोटी घ्या, रोपाची व्यवस्थित वाढ झाली की, कुंडी बदलू शकता.
छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, कोरफड होईल जाडजूड, गर भरपूर
ब्रह्मकमळाच्या रोपाला जास्त सूर्यप्रकाश गरजेचा नसतो. यामुळे याची पाने जळतात आणि रोप कोमेजून जाते. तसेच रोप कुंडीत लावताना मातीत वाळू मिसळा. वाळू मातीचा निचरा सुधारते आणि पाणी साचवून ठेवत नाही. ज्यामुळे मुळं सहज श्वास घेऊ शकतात आणि झाड जोमाने वाढण्यास मदत होते.
रोपाला सेंद्रिय खत, शेणखत, वाळलेली पाने किंवा स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून तयार केलेलं कंपोस्ट मातीला पोषक बनवतं, यामुळे झाडाला नैसर्गिक पोषण मिळतं आणि फुलांची वाढ जलद होते.ब्रह्मकमळाच्या झाडांना फुले न येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त पाणी देणे. ब्रह्मकमळाच्या झाडांना खूप कमी पाण्याची आवश्यकता असते, माती पूर्णपणे कोरडी असतानाच त्यांना पाणी द्या. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात. ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि फुले येत नाही.
