तुळशीला (Tulsi Plant) फक्त धार्मिक महत्वचं नाही तर ती एक उत्तम औषधी वनस्पतीसु्द्धा आहे. तुमच्या घरातील तुळस हिरवीगार आणि डेरेदार दिसावी असं तुम्हाला असेल तर तिच्या कुंडीतल्या मातीचा पोत आणि पोषण खूप महत्वाचे असते. प्रत्येकाच्यात बाल्कनीत किंवा दारात तुळस असतेच पण ती कायम बहरलेली राहावी यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. तुळशीच्या रोपासाठी कोणती खतं फायदेशीर ठरतात समजून घ्या. (How To Keep Tulsi Plant Healthy)
तुळशीसाठी माती योग्य असावी
तुळशीसाठी पाणी धरून न ठेवणारी, भुसभुशीत माती आवश्यक असते. चिकट मातीमुळे मुळं सडतात. साधारणपणे ६० टक्के माती आणि ३० टक्के वाळू किंवा कोकोपीट, १० टक्के खत असं मिश्रण उत्तम ठरतं. वाळू किंवा कोकोपीटमुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि माती भुसभुशीत राहते.
तुळशीत खत कोणतं घालावं?
गांडूळ खत हे सर्वात सोपे आणि उत्तम खत आहे. हे मातीत मिसळल्यानं तुळशीचा आवश्यक पोषण मिळते आणि मातीचा पोत सुधारतो.शेण खत पूर्णपणे कुजलेले शेणखत मातीत मिसळल्यास तुळस लवकर वाढते आणि बहरते. कडुलिंबाची पेंड हे खत तुळशीसाठी वरदान ठरतं.
यामुळे रोपाला पोषण तर मिळतेच पण मातीमध्ये होणारी बुरशी आणि किडींचा संसर्गही कमी होतो. दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा २ चमचे कडुलिंबाची पेंड मातीत मिसळावी. याशिवाय काही प्रमाणात कॉफी पावडर मातीत मिसळल्यास तुळशीला आवश्यक पोषण मिळते. १ चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा मीठ १ कप पाण्यात मिसळून ते द्रावण मातीत घाला.
पाण्याचा निचरा
कुंडीच्या तळाशी छिद्र आहेत. याची खात्री करा आणि छिद्रांवर खापऱ्यांचे किंवा दगडाचे २-३ तुकडे ठेवा जेणेकरून पाणी सहज बाहेर पडेल. तुळशीला रोज खूप जास्त पाणी देऊ नका. माती फक्त ओलसर राहील इतकंच पाणी प्या. तुळशीला दिवसातून किमान ३ ते ४ तास सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. तुळशीच्या वरवरची माती दर पंधरा दिवसांनी भुसभुशीत करावी. मंजिरी वेळच्यावेळी काढून टाकाव्यात त्यामुळे तुळस जास्त फांद्या फुटून डेरेदार होते.
