Lokmat Sakhi >Gardening > मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वाढ नाही? स्वयंपाकघरातील पांढरा पदार्थ करेल कमाल - पानं होतील हिरवीगार...

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वाढ नाही? स्वयंपाकघरातील पांढरा पदार्थ करेल कमाल - पानं होतील हिरवीगार...

how to increase growth of money plant using epsom salt : how to use epsom salt for money plant : epsom salt for money plant care : make money plant leaves green and shiny : home remedy for yellow money plant leaves : मनी प्लांटच्या पानांचा रंग बदलून पानं पिवळी पडली, करा एक साधासोपा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 10:05 IST2025-08-05T10:00:00+5:302025-08-05T10:05:02+5:30

how to increase growth of money plant using epsom salt : how to use epsom salt for money plant : epsom salt for money plant care : make money plant leaves green and shiny : home remedy for yellow money plant leaves : मनी प्लांटच्या पानांचा रंग बदलून पानं पिवळी पडली, करा एक साधासोपा घरगुती उपाय...

how to increase growth of money plant using epsom salt how to use epsom salt for money plant home remedy for yellow money plant leaves make money plant leaves green and shiny | मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वाढ नाही? स्वयंपाकघरातील पांढरा पदार्थ करेल कमाल - पानं होतील हिरवीगार...

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वाढ नाही? स्वयंपाकघरातील पांढरा पदार्थ करेल कमाल - पानं होतील हिरवीगार...

मनी प्लांट हे जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात असणारे सुंदर आणि आकर्षक रोप. हे रोप घराची शोभा तर वाढवतात, सोबतच घरातील वातावरण प्रसन्न व फ्रेश ठेवण्यास मदत करतात. घर, गॅलरी किंवा खिडकीत लावलेले इवलेसे मनी प्लांटचे रोप छान हिरवेगार आणि टवटवीत दिसत असेल तर अधिकच छान दिसते. परंतु अनेकदा बऱ्याचजणांची (how to increase growth of money plant using epsom salt) तक्रार असते की, मनी प्लांटची पाने (how to use epsom salt for money plant) पिवळी पडतात, पानांचा आकार लहान आणि रंग फिका होत जातो. या रोपाची पाने पिवळी पडली किंवा त्यांचा रंग फिका होऊन ती निस्तेज दिसू लागली की, यामुळे रोपाचे सौंदर्य बिघडते आणि त्याची वाढही खुंटते. मनी प्लांटच्या (epsom salt for money plant care) रोपाची ही स्थिती, अयोग्य देखभालीमुळे किंवा काही विशेष कारणांमुळे उद्भवते. अशावेळी रोपाची योग्य ती काळजी घ्यायला हवी आणि काही घरगुती उपायांचा वापर केल्यास मनी प्लांट पुन्हा एकदा टवटवीत आणि पाने हिरवीगार होऊ शकतात. तुम्ही सुद्धा मनीप्लांटची खूप काळजी घेत असूनही जर ही समस्या येत असेल, तर काही सोप्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे(home remedy for yellow money plant leaves).

यावर उपाय म्हणून, बाजारातील महागड्या रासायनिक खतांचा (how to make money plant bushy naturally) वापर करण्याऐवजी, आपण काही नैसर्गिक घरगुती उपायांचा वापर करु शकतो. यामुळे रोपाचे आरोग्य सुधारते आणि पाने पुन्हा हिरवीगार होतात. मनी प्लांटला पुन्हा सुंदर, टवटवीत व पाने हिरवीगार होण्यासाठी कोणता घरगुती उपाय फायदेशीर ठरतो ते पाहूयात... 

मनी प्लांटची पाने पिवळी पडली असता ती पुन्हा हिरवीगार करण्याचा उपाय... 

 मनी प्लांटची पाने पिवळी पडली असता ती पुन्हा हिरवीगार करण्यासाठी एप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर उपयोगी ठरतो. हा मनी प्लांटसाठी एक प्रकारचा जादूई उपायच आहे. यामध्ये असणारं मॅग्नेशियम, रोपांमधील क्लोरोफिलचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळे पानांचा रंग अधिक गडद आणि चमकदार होतो. एवढंच नाही, तर हे मनी प्लांटच्या मुळांना आवश्यक पोषक घटकही पुरवतं, ज्यामुळे रोपाची वाढ लवकर आणि अधिक चांगली होते.

नारळाच्या शेंड्याचं झटपट करा कोकोपीट, विकतसाठी मोजायलाही नको फार पैसे-रोपांसाठीही पर्यावरणपूरक उपाय...

नेमका उपाय काय आहे ? 

मनी प्लांटच्या रोपासाठी एप्सम सॉल्टचा वापर करण्यासाठी आपल्याला एप्सम सॉल्ट व पाण्याचे द्रावण तयार करावे लागेल. यासाठी १ लिटर पाण्यात १ टेबलस्पून एप्सम सॉल्ट घालून ते नीट ढवळा. हे तयार झालेलं द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. दर १५ दिवसांनी मनी प्लांटच्या पानांवर या द्रावणाची  फवारणी करा. जर हे द्रावण उरले असेल, तर ते आपण रोपाच्या मातीमध्येही टाकू शकता. यामुळे पानांचा रंग अधिक गडद, तजेलदार आणि रोप निरोगी राहण्यास मदत होते. आपण एप्सम सॉल्ट थेट मनी प्लांटच्या कुंडीतील मातीमध्ये देखील टाकू शकता. लहान कुंडीसाठी अर्धा चमचा व मोठ्या कुंडीसाठी एक चमचा एप्सम सॉल्ट पुरेसे आहे. हे मीठ मातीमध्ये नीट मिसळा. यामुळे झाडाच्या मुळांना बळकटी येईल आणि वाढीला चालना मिळेल. याचबरोबर, किमान महिन्यातून एकदा एप्सम सॉल्ट मिसळलेल्या पाण्याने मनी प्लांटची पाने स्वच्छ पुसून घेऊ शकता किंवा पानांवर फवारणी करू शकता. यामुळे मातीतील पोषक तत्त्वांचे संतुलन टिकून राहते आणि झाडाची संपूर्ण वाढ सुधारते.

ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. एप्सम सॉल्टचा अतिवापर करू नका, दिलेल्या योग्य प्रमाणातच त्याचा वापर करावा. 

२. एप्सम सॉल्ट फक्त मनी प्लांटपुरता मर्यादित नसून, इतर झाडांसाठी देखील वापरता येते. 

३. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी एप्सम सॉल्ट मिसळलेले पाणी सकाळी किंवा संध्याकाळी रोपांच्या कुंडीत घालावे. 

४. एप्सम सॉल्ट वापरण्याबरोबरच मनी प्लांटची योग्य काळजी घेणेही गरजेचे आहे, नियमित पाणी व पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. 

Web Title: how to increase growth of money plant using epsom salt how to use epsom salt for money plant home remedy for yellow money plant leaves make money plant leaves green and shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.