आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विड्याच्या पानांना विशेष असे महत्व आहे. आपल्याकडील प्रत्येक सणवार, खास शुभ प्रसंग, पूजापाठ किंवा इतर काही धार्मिक कार्यात विड्याच्या (Paan Ki Bel Growth) पानांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. विड्याच्या पानांशिवाय आपल्याकडील कुठलेही धार्मिक कार्य हे अधुरेच आहे. सध्या गौरी - गणपतीचे आगमन आता अवघ्या काही (How to grow paan plant at home) दिवसांवरच आले आहे. गौरी-गणपतीच्या पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर हमखास केलाच जातो. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये विड्याची पाने विकत (Increase betel leaf growth naturally) आणली जातात तर काही घरांमध्ये विड्याच्या पानांचा (How To Increase Betel Leaf Plant) वेल लावला जातो. घरातच जर विड्याच्या पानांचा वेल असेल तर आपण पूजेसाठी याच पानांचा वापर करतो. पण या रोपाला दाट आणि भरपूर पाने यावीत यासाठी योग्य निगा राखणे आवश्यक असते(Betel leaf plant care tips).
पूजेसाठी लागणारी ही विड्याची पाने ताजी, टवटवीत आणि सुंदर असावीत यासाठी विड्याच्या पानांच्या वेलीची वेळीच योग्य ती देखभाल करावी लागते. वापरलेल्या चहा पावडरमध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असे पोषक घटक असतात, ज्यामुळे विड्याच्या पानांचे रोप अधिक निरोगी आणि हिरवेगार होते. वापरलेल्या चहा पावडरचा योग्य वापर कसा करायचा, जेणेकरून तुमच्या विड्याच्या पानांच्या वेलीला भरपूर पाने येतील याबद्दल खास टिप्स पाहूयात. घरच्याघरीच वापरलेल्या चहा पावडरचे नैसर्गिक खत वापरून विड्याच्या पानांच्या वेलीला अधिक सुंदर आणि हिरवेगार कसे करता येतील ते पाहूयात.
विड्याच्या पानांचा वेल हिरवागार होऊन वाढेल भराभर...
चहा गाळल्यानंतर आपण वापरलेली चहा पावडर लगेच फेकून देतो. पण या वापरलेल्या चहा पावडरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे विड्याच्या पानांच्या रोपाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. यात नायट्रोजन, आम्लीय गुणधर्म आणि कार्बनी पदार्थ असतात. ही चहा पावडर आपण मनी प्लांट, विड्याची पाने यांसारख्या कोणत्याही रोपांमध्ये टाकल्यास देखील खूप फायदा होतो.
चहा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असते, जे विड्याच्या पानांच्या रोपासाठी सर्वात आवश्यक पोषक घटक आहे. हे पानांची वाढ होण्यास मदत करते आणि त्यांना गडद हिरवा रंग देते. विड्याच्या पानांच्या रोपाला थोडी आम्लीय माती अधिक फायदेशीर ठरते. चहा पावडरचा वापर मातीचा पीएच (pH) स्तर संतुलित ठेवतो, ज्यामुळे विड्याच्या पानांचा वेल पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. यातील कार्बनी पदार्थ मातीला नरम आणि हवेशीर करतात ज्यामुळे मुळांना पसरण्यास आणि श्वास घेण्यास मदत मिळते.
विड्याच्या पानांच्या वेलीसाठी चहा पावडरचा वापर कसा करावा ?
चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पावडर स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यात असलेली साखर आणि दूध पूर्णपणे निघून गेले पाहिजे. साखर आणि दूध रोपाला नुकसान पोहोचवू शकतात आणि बुरशी तसेच मुंग्या येण्याचे कारण होऊ शकते. चहा पावडर धुवून झाल्यावर ती कडक उन्हात चांगली वाळवून घ्या.
तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...
वाळलेली चहा पावडर तुम्ही थेट कुंडीतील मातीमध्ये टाकू शकता. एका लहान किंवा मध्यम आकाराच्या कुंडीसाठी एक चमचा वाळलेली चहा पावडर पुरेशी आहे. ती मातीच्या वरच्या थरात हलकेच मिसळून घ्या. याचबरोबर, चहा पावडर पाण्यात भिजवून द्रवरूप खत देखील तयार करु शकता. यासाठी, १ लिटर पाण्यात एक चमचा वाळलेली चहा पावडर टाकून २४ तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून रोपाच्या मुळाशी घाला.
अशीही घ्या काळजी...
विड्याच्या पानांच्या रोपाला तुम्ही प्रत्येक १५ ते २० दिवसांनी एकदा चहा पावडरचे खत किंवा पाणी देऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात वापरू नका. खत घालण्याव्यतिरिक्त, रोपाची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. विड्याच्या पानांच्या वेलीला हलका सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ती लावावी. जास्त कडक उन्हामुळे पाने जळू शकतात. वेलीला जास्त पाणी देऊ नका. माती ओलसर ठेवा, पण पाणी तेव्हाच द्या जेव्हा मातीचा वरचा थर थोडा कोरडा वाटेल.विड्याच्या पानांचा वेल असल्यामुळे, त्याला वाढण्यासाठी आधार द्यायला विसरू नका.