आपल्या सगळ्यांच्याच घरीदारी तुळशीचे एखादे सुंदर रोपं असतेच. आपल्या भारतीय परंपरेत तुळशीच्या रोपाला फार पवित्र आणि धार्मिक मानले जाते. आपल्या दारापुढची तुळस छान हिरवीगार, बहरलेली असेल तर अशी तुळस पाहून मन प्रसन्न होते व समाधान वाटते. परंतु बरेचदा आपल्यापैकी काहीजणांना तुळशीच्या रोपाशी (How To Identify Root Bound In Tulsi Plant & Know Its Solution) संबंधित अनेक तक्रारी असतात. तुळशीच्या (Tulsi Plant) रोपाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडू लागतात, पान गळती सुरु होते, रोप सुकू लागते, कोमेजून जाते अशा एक ना अनेक तक्रारी असतात. अशा परिस्थितीत, आपल्याला वाटते आपण तुळशीच्या रोपाची योग्य पद्धतीने काळजी घेत आहोत तरी देखील तुळशीच्या रोपाला बहर येतच नाही( How to Identify and Fix a Root Bound In Tulsi Plant).
तुळशीच्या रोपाची अनेक प्रकारे काळजी घेतली तरी तुळशीच्या रोपात फरक दिसत नसेल तर यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे "Root Bound" होणे. जेव्हा एखादं झाड किंवा रोपं खूप दिवस एकाच कुंडीत असते, तेव्हा त्याच्या मुळांचा पसारा वाढून कुंडीच्या आतच गुंतून जातो आणि त्यांच्या वाढीस योग्य आणि मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे झाडाला आवश्यक अन्नद्रव्ये आणि पाणी मिळत नाही व परिणामी त्याची वाढ खुंटते. यासाठीच, आपण देखील तुळशीचे रोप वर्षानुवर्षे एकाच कुंडीत लावले असल्याने रोपाचे "Root Bound" झाले असेल तर नेमकं काय करावं ते पाहूयात.
रुट बाउंड होणे म्हणजे नेमकं होत काय ?
जेव्हा रोपांची मुळे कुंडीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतात की त्यांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही आणि त्या एकमेकांमध्ये गुंतून जाऊन गुच्छाच्या स्वरूपात एकाच जागी जमा होतात, तेव्हा या स्थितीला 'Root Bound' असे म्हणतात. तुळशीच्या रोपांच्या मुळाशी अशी स्थिती निर्माण झाली की त्याची वाढ थांबते, पाने पिवळी पडू लागतात आणि रोप कमकुवत दिसू लागते. अशा रोपाची पाने नीट मोठी होत नाहीत आणि छोट्या पानांच्यामध्ये फक्त मंजिरी दिसू लागते. ही परिस्थिती रोपाच्या एकूण आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय? १ भन्नाट ट्रिक - त्रास होईल कमी...
यावर उपाय म्हणून नेमकं करायचं काय ?
जर तुमच्या तुळशीच्या रोपांमध्ये रूट बाउंडची समस्या असेल, तर ती ओळखून वेळेत योग्य उपाय करणे खूप गरजेचे असते. गार्डनिंग एक्सपर्ट आस्था यांनी यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे – फक्त थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तुळशीचे रोप सर्वातआधी जुन्या कुंडी मधून बाहेर काढा आणि त्याला एक साईझ मोठ्या कुंड्यात लावा. मात्र हे करताना योग्य पद्धत वापरणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून झाडाच्या मुळांना इजा होणार नाही आणि ते नवीन जागेत सहज रुजतील.
तुळशीचे रोप नव्या कुंडीत कसे लावावे ?
तुळशीचे रोप जुन्या कुंडीतून बाहेर काढल्यानंतर, त्याच्या जुन्या मुळांचा सुमारे ७०% भाग हलक्या हाताने कापून बाजूला काढावा. यानंतर एक साईझ मोठ्या कुंड्यात माती भरावी आणि त्यात सेंद्रिय खत किंवा शेण खत मिसळावे. त्यानंतर तुळशीचे रोप त्या नवीन कुंडीत लावावे. या प्रकारे रोपांच्या मुळांना पसरण्यासाठी अधिक जागा मिळते आणि त्याची वाढ पुन्हा सुरू होते. त्यामुळे रोप निरोगी आणि टवटवीत दिसू लागते.
ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...
लक्षात ठेवून करा आणखीन ही २ महत्वाची कामं...
तुळशीचं रोपं नवीन कुंडीत लावल्यानंतर तुम्हाला अजून दोन महत्त्वाची कामं आठवणीने करावी लागतील. गार्डनिंग एक्सपर्ट आस्था यांच्या मते, सर्वप्रथम रोपाची कटिंग किंवा प्रूनिंग करावी. यामुळे नवीन, टवटवीत आणि हिरव्या पानांना नव्याने उगवण्यास जागा मिळेल व रोपाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. त्यानंतर रोपांवर असलेल्या सर्व मंजिरी काढून टाका, कारण मंजरीमुळे रोपाच पोषण वाया जातं आणि रोपाची वाढ खुंटते. या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींमुळे तुळशीचं रोप पुन्हा जोमाने वाढू लागेल.