Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार...

तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार...

How to grow tulsi from seeds : easy & best way to plant tulsi from seeds at home : तुळशीभोवती पडणाऱ्या मंजिरीपासूनच, कुंडीत लावा नवीन रोपं! न सुकता वाढेल भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2025 10:00 IST2025-10-12T10:00:00+5:302025-10-12T10:00:02+5:30

How to grow tulsi from seeds : easy & best way to plant tulsi from seeds at home : तुळशीभोवती पडणाऱ्या मंजिरीपासूनच, कुंडीत लावा नवीन रोपं! न सुकता वाढेल भरभर...

How to grow tulsi from seeds easy & best way to plant tulsi from seeds at home | तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार...

तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार...

भारतीय संस्कृतीत तुळशीचे रोप हे फक्त एक साधी वनस्पती नसून, तुळशीला धार्मिक, आयुर्वेदिक व औषधी वनस्पतीचे महत्त्वाचे स्थान आहे. बहुतेक प्रत्येक घरात, अंगणात किंवा बाल्कनीत (How to grow tulsi from seeds) तुळस लावली जाते. तुळशीच्या रोपाला नियमित पाणी देणे, पूजा करणे आणि त्याची काळजी घेणे हे आपल्यापैकी अनेकांच्या डेली रुटीनचा भाग असते. पण तुळशीच्या रोपाची काळजी घेताना एक गोष्ट वारंवार जाणवते, ती म्हणजे तुळशीवर येणाऱ्या छोट्या - छोट्या मंजिरी...मंजिरी आल्यावर तुळशीचे रोप सुकायला लागते आणि काही दिवसांनी ही मंजिरी, वाळून तुळशीच्या आजूबाजूला आणि कुंड्यांमध्ये गळून पडते(easy & best way to plant tulsi from seeds at home).

अनेकदा आपण या मंजिरीना फक्त कचरा समजून फेकून देतो. परंतु आपण निरुपयोगी समजून ज्या मंजिरी फेकून देतो, त्यामध्ये हजारो तुळशीच्या बिया लपलेल्या असतात, ज्याचा वापर करून आपण सहजपणे आणि अगदी कमी वेळात एक नवीन तुळशीचे रोप मातीत लावू शकतो. यामुळे आपापले अंगण किंवा बाल्कनी नेहमी तुळशीच्या हिरव्यागार रोपांनी भरलेली राहील तसेच बाजारातून वारंवार नवीन रोपे विकत घेण्याची गरज पडणार नाही. तुळशीच्या मंजिरी फेकून न देता, त्यापासून नवीन आणि निरोगी तुळशीचे रोप कसे उगवायचे, याची सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात.  तसेच, हे रोप लावल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, जेणेकरून ते लवकर वाढेल, याबद्दलच्या काही खास टिप्सही लक्षात ठेवूयात.. 

तुळशीच्या मंजिरी फेकून देऊ नका... 

१. मंजिरी गोळा करणे :- तुळशीच्या रोपावर पूर्णपणे वाळलेल्या आणि तपकिरी झालेल्या मंजिरी तोडून घ्या. त्या हाताने चोळून त्यातील लहान, काळ्या बिया  मातीमध्ये किंवा एका कागदावर गोळा करा.

२. मातीची निवड :- रोप लावण्यासाठी गाळाची माती किंवा माती आणि कंपोस्ट खत यांचे मिश्रण (५०:५०) एका कुंडीत भरून घ्या. 

३. बिया पेरणे :- कुंडीतील माती थोडी ओलसर करा. त्यानंतर या मंजिरीतील बिया मातीच्या पृष्ठभागावर हलकेच पसरवा. बिया जास्त खोलवर मातीत रुजवू  नका, अन्यथा त्यांना उगवायला अडचण येईल.

तुळशीचे रोप वारंवार लावूनही सूकतेच ? मातीत मिसळा २ पदार्थ - पाने होतील हिरवीगार, रोप वाढलेलं भराभर... 

४. पाणी देणे :- बिया पेरल्यानंतर स्प्रे बॉटलने किंवा अगदी हळूहळू पाणी द्या, जेणेकरून बिया मातीतून बाहेर येणार नाहीत. माती फक्त ओलसर ठेवा, जास्त चिखल करू नका.

५. रोपाची जागा :- कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातून ३ ते ५ तास सूर्यप्रकाश मिळेल. साधारण १ ते २ आठवड्यांत लहान रोपे उगवण्यास सुरुवात होईल.

भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय...

तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्यावी ? 

१. रोप लहान असताना माती कोरडी पडू देऊ नका, पण पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. पाणी साचल्यास मुळे सडतात.
२. सूर्यप्रकाश तुळशीच्या वाढीसाठी रोजचा पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
३. तुळशीच्या रोपाची वाढ चांगली व्हावी म्हणून, त्यावर नवीन मंजिरी दिसू लागताच त्या लगेच तोडून टाका. यामुळे रोपाची उंची वाढते आणि ते अधिक दाट होते.
४. रोप थोडे मोठे झाल्यावर दर २ ते ३ महिन्यांनी कंपोस्ट खत किंवा शेणखत थोड्या प्रमाणात द्या. रासायनिक खतांचा वापर टाळावा.

Web Title : मंजरी से तुलसी उगाएं: हरे-भरे पौधे के लिए सरल उपाय।

Web Summary : तुलसी मंजरी को न फेंके! इसके बीजों से आसानी से नए पौधे उगाएं। बीज इकट्ठा करें, नम मिट्टी में बोएं, धूप दें। स्वस्थ, हरी तुलसी के लिए नई वृद्धि को ट्रिम करें और कभी-कभी खाद डालें।

Web Title : Grow Tulsi from Manjari: Simple steps for a lush plant.

Web Summary : Don't discard Tulsi Manjari! Easily grow new plants from its seeds. Collect seeds, sow in moist soil, provide sunlight. Trim new growth, fertilize occasionally for healthy, green Tulsi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.