Join us

मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 16:22 IST

How to grow healthy curry leaves in pots : कुंडीत लावलेल्या कडीपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होत नसेल तर हा घ्या उपाय..

फोडणीमध्ये कडीपत्ता (Curry Leaves) घालताच, पदार्थाची चव वाढते. पण बरेच जण पदार्थातून कडीपत्ता वगळून काढतात. कडीपत्ता फक्त पदार्थापुरता मर्यादित नसून, याच्या सेवनाने आरोग्य, केस आणि त्वचेलाही फायदा होतो. बाजारातून कोथिंबीर-मिरचीसोबत दुकानदार आपल्याला कडीपत्ता ही देतो. हिरवागार कडीपत्ता अनेकदा घरी आणला की लगेच वाळून जातो. वाळला की कडीपत्त्याची चव पूर्ण बदलते.

काही वेळा तर कडीपत्ता इतका काळा पडतो की तो फेकून द्यावा लागतो. शिवाय घरातील कडीपत्ता संपला की, पुन्हा बाजारात जावे लागते (Gardening Tips). पण बाजारात न जाता आपण घरातही कडीपत्त्याचे रोपटे लावू शकता. कुंडीत कडीपत्त्याचे रोपटे लावणे तसे सोपे आहे. जर कुंडी डेरेदार कडीपत्त्यांनी फुलावी असे वाटत असेल तर, मातीत ३ गोष्टी मिसळा. कडीपत्त्याचे रोप जास्त वाढेल(How to grow healthy curry leaves in pots).

तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका

कुंडीत कडीपत्त्याचे रोपटे लावत असाल तर, लक्षात ठेवा काही टिप्स

- कडीपत्त्याची योग्य वाढ होण्यासाठी, रोपटे नेहमी सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी ठेवा.

- महिनाभरानंतर काळपट पडलेली पानं छाटून काढा. ज्यामुळे रोपट्याला नविन हिरवीगार पानं येतील.

- जर कडीपत्त्याच्या रोपट्याला हिरवीगार पानं येत नसतील तर, रोपट्यातील पानं छाटून काढा. नंतर मातीसकट कडीपत्त्याचे रोपटे दुसऱ्या कुंडीत लावा.

- दुसऱ्या कुंडीत कडीपत्त्याचे रोपटे लावण्यापूर्वी त्यात नवीन माती भरा. मातीत ग्रास पावडर, वर्मी कंपोस्ट आणि कोको पीट मिसळा.

खिडकीतल्या कुंडीतही वाढेल हिरवीगार कोथिंबीर, करा ५ गोष्टी-खा ताजी कोवळी कोथिंबीर

- कडीपत्त्याचे रोपटे लावण्यापूर्वी मुळातील माती काढून घ्या, व रोपटे नव्या कुंडीत लावा. आपण त्यात मोहरीची पेंड देखील मिक्स करू शकता. यामुळे रोपट्याला हिरवीगार पानं येतील.

- कडीपत्त्याच्या रोपट्याला सकाळी अधिक पाणी घाला. पण जास्त पाणी घालणं टाळा. जास्त पाणी घातल्यामुळे रोपट्याची मुळे कुजतात.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया