हिवाळा असो किंवा पावसाळा, 'आलं' हे घरच्या स्वयंपाकघरातील सगळ्यात उपयोगी आणि औषधी गुणांनीयुक्त असा खास पदार्थ. जेवणातील एखादा पदार्थ असो असो किंवा गरमागरम चहा, आल्याशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होऊ शकत नाहीत. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या आहारापर्यंत वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. आलं हे स्वयंपाकघरातील नेहमी वापरले जाणारे औषधी गुणधर्मांनी युक्त असे मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे(how to grow ginger in pot quickly).
अनेकदा आपण बाजारातून आलं एकदम एकाचवेळी विकत घेऊन येतो. परंतु अनेकदा हे विकत आणलेलं आलं काही दिवसातच लगेच खराब होतं किंवा सुकू लागते. यामुळे, आपण बाजारातून प्रत्येकवेळी आलं विकत न आणता, घरातच छोट्याशा कुंडीत आल्याचे छोटेसे रोप लावू शकतो. आलं कुंडीत उगवणे हे वाटते तितके कठीण काम नाही. यासाठी कोणत्याही साहित्याची किंवा विशेष साधनांची गरज लागणार नाही. काही सोप्या युक्त्या आणि थोड्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर अगदी सहजपणे आलं लावू शकता आणि तेही वर्षभर... घरच्याघरीच आल्याचे रोप लावताना आपल्याला फारशी मेहनत न घेता, अगदी फुकटात हव तितकं ताजं आलं घरात मिळू शकतं. तुमच्या घरातल्या आल्याच्या छोट्याशा तुकड्यापासून तुम्ही पुन्हा नवीन आलं (How To Grow Ginger At Home) घरच्याघरीच लावू शकता. घरच्याघरीच छोटाशा कुंडीत आलं कसं उगवावं, याची एक सोपी ट्रिक पाहूयात...
घरच्याघरीच छोटाशा कुंडीत आलं कसं लावावं ?
१. कोंब आलेलं आलं घ्या :- सर्वात आधी बाजारातून तेच आले विकत घ्या, ज्याला छोटे छोटे कोंब फुटलेले असतील. हेच कोंब पुढे रोप बनतात. कोंब असलेल्या भागांना तोडून छोटे छोटे तुकडे करा. आल्याला बुरशी लागण्यापासून वाचवण्यासाठी आलं, फंगीसाइड (Fungicide - बुरशीनाशक) पाण्यात मिसळून या तुकड्यांना साधारण १० मिनिटांसाठी भिजवून ठेवा. पाण्यात मिसळून या तुकड्यांना साधारण १० मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
२. कुंडीची निवड :- आल हे असे रोप आहे ज्याची मुळे जमिनीच्या आत पसरतात, त्यामुळे कुंडीची निवड करणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला आलं लावण्यासाठी तुम्ही ७ ते ८ इंचाची कुंडी घेऊ शकता. पण, जेव्हा रोपे मोठी होतील आणि त्यांना ट्रान्सप्लांट करायचे असेल, तेव्हा तुम्हाला १० इंच किंवा त्याहून मोठी कुंडी लागेल. तुम्ही ग्रो बॅगचाही (Grow Bag) वापर करू शकता, ज्यात जागा जास्त असते. कुंडीच्या तळाशी असलेले छिद्र बंद होण्यापासून वाचवण्यासाठी, त्यावर दगड किंवा गोटे नक्की ठेवा. यामुळे जास्त पाणी सहजपणे बाहेर पडेल. आल्यासाठी भुसभुशीत आणि पोषक तत्वयुक्त माती तयार करण्यासाठी त्यात कोकोपीट, शेणखत किंवा वर्मीकंपोस्ट घालावे.
३. रोप कसे लावावे :- कुंडीत माती भरल्यानंतर, ७ ते ८ इंचाच्या कुंडीत २ किंवा ३ आल्याचे तुकडे घाला. तुकडे लावल्यानंतर, त्यांना साधारण २ इंच जाड मातीच्या थराने झाकून टाका. हलक्या हाताने पाणी घाला. जास्त पाणी बिलकुल घालू नका, नाहीतर आल्याचे मूळ खराब होईल आणि त्यात बुरशी लागेल. मातीमध्ये केवळ ओलावा टिकून राहिला पाहिजे.
४. योग्य काळजी घ्या :- साधारण १५ दिवसांत तुमचे रोप मातीतून बाहेर येऊन अंकुरित होईल. कुंडी अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्याला रोज ३ ते ४ तास हलके ऊन मिळेल. आल्याचे रोप थेट कडक उन्हात तितके चांगले वाढत नाही, याला थोड्या सावलीची गरज असते. एक महिन्यानंतर जेव्हा रोप थोडे मोठे होईल, तेव्हा तुम्ही त्याला १० इंचाच्या मोठ्या कुंडीत ट्रान्सप्लांट करू शकता.
