कमी दिवसांत भरपूर फुलं देणारं रोप कोणतं याचा तुम्ही शोध घेत असाल तर लगेचच नर्सरीमध्ये जा किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर ऑर्डर करा आणि फ्रेंच मेरीगोल्ड हे रोप वाढवून घ्या. झेंडूची खूप वेगवेगळी फुलं बाजारात मिळतात. दसरा- दिवाळीच्या काळात बाजारात येणारा झेंडू खूप टपोरा असतो. एरवी थोडं लहान आकाराचं फूल मिळतं. त्याचबरोबर आणखी एक आकाराने लहान असणारी आणि केशरी- पिवळ्या रंगांची सुंदर छटा असणारी झेंडूची फूलंही बाजारात मिळतात. ती फुलं म्हणजेच फ्रेंच मेरिगोल्ड. हे रोप आपल्या घरच्या छोट्याशा कुंडीतही छान वाढतं आणि विशेष म्हणजे खूप जास्त काळजी न घेताही त्याला भरपूर फुलं येतात (how to grow French marigold plant in terrace garden?). हे रोप तुम्हाला तुमच्या घरी लावायचं असेल तर नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं ते पाहा...(gardening tips for French marigold plant)
फ्रेंच मेरिगोल्ड रोप कुंडीमध्ये कसं लावायचं?
१. फ्रेंच मेरिगोल्डचं रोप वाढण्यासाठी खूप मोठ्या आकाराच्या कुंडीची गरज नसते. त्यामुळे मध्यम आकाराची कुंडी तुम्ही निवडू शकता. कुंडी साधारण ८ ते १० इंचाची असावी. तसेच कुंडीच्या तळाशी ३ ते ४ छिद्रे करून घ्यावीत, जेणेकरून जास्तीच्या पाण्याचा योग्य तो निचरा होईल.
पाठ- कंबरेच्या दुखण्याने हैराण झालात? अंथरुणावर पडूनच करा ४ व्यायाम, कंबरेला मिळेल आराम
२. या रोपासाठी माती तयार करणंही सोपं आहे. त्यासाठी ६० टक्के माती ३० टक्के गांडूळ खत किंवा शेणखत आणि १० टक्के वाळू असं सगळं एकत्र करा आणि त्याने कुंडी भरा. यामुळे माती अधिक कसदार होऊन रोपाची चांगली वाढ होईल.
३. या मातीमध्ये आता नर्सरीतून आणलेलं रोप लावा. रोप आणताना त्यावर रोग नाही ना, पानं जळालेली किंवा त्यांच्यावर बारीक छिद्रं तर नाही ना, हे तपासून घ्या.
बाळंतपणानंतर ओटीपोट खूप सुटलं? आजीबाईंनी सांगितले जुने पारंपरिक उपाय- काही महिन्यांतच पोट सपाट
४. रोप लावल्यानंतर कुंडी अशा ठिकाणी ठेवावी जिथे ५ ते ६ तास ऊन येईल. कारण जास्त ऊन मिळालं की फ्रेंच मेरिगोल्ड अधिक जोमात वाढतं. तसेच मातीचा वरचा थर सुकलेला दिसल्यानंतरच त्याला पाणी घालावे.
