हिरवीगार पाने असणारी मेथीची भाजी हिवाळ्यात खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. बाजारांतून मेथीची जुडी विकत आणली की, आपण मेथीच्या भाजी पासून त्याचे अनेक पदार्थ तयार करतो. परंतु ही मेथीची भाजी विकत आणण्यापेक्षा घरच्याघरीच छोटाशा कुंडीत, बाल्कनीत उगवली तर... सध्या घरगुती गार्डनिंगची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातही जर आपल्याच गार्डन किंवा बाल्कनीतून उगवलेली ताजी, हिरवी पालेभाजी खाण्याची एक वेगळीच मजा असते(How To Grow Fenugreek From Methi Seeds At Home).
मेथी ही कमी जागेत आणि फारशी मेहेनत न घेता अगदी लहानशा कुंडीतही लावता येते. मेथीची पाने फक्त चविष्टच नसतात तर आयर्न, फायबर व व्हिटॅमिन्स असल्याने आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहेत. फक्त ७ ते १० दिवसांत तुमच्या ( Easy way to grow methi at home) रोजच्या जेवणात वापरण्यासाठी ताजी, सेंद्रिय मेथी घरीच कशी उगवायची ते पाहा...
छोट्या कुंडीत मेथी उगवण्याची सोपी पद्धत....
घरची मेथी उगवण्यासाठी तुम्हाला फक्त मेथीदाणे, थोडी माती आणि एक छोटा कुंडी-पॉट एवढीच सामग्री लागते. सर्वप्रथम कुंडीच्या तळाला दगड किंवा गोट्यांची लेयर द्या जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल. त्यावर बागेची माती, कंपोस्ट किंवा लाल माती, शेणखत यांचे मिश्रण भरून माती हलकी-भुरभुरीत करा.
थंडीत आवर्जून खा पारंपरिक आवळ्याची डाळ! चवीला अप्रतिम, आरोग्यासाठी पौष्टिक - हिवाळ्यातील सुपरफूड!
आता एका वाडग्यात ५ ते ६ तास भिजवलेले मेथीदाणे कुंडीत समान पद्धतीने पेरा. दाणे नेहमी जास्त खोल पेरू नका; फक्त हलक्या हाताने मातीत दाबा आणि वर पातळ मातीचे आवरण द्या. त्यानंतर फवारणीने हलके पाणी मारा जेणेकरून बी हलणार नाही.
कुंडी एखाद्या उजेडाच्या पण थेट कडक उन्हापासून थोड्या दूर जागेत ठेवा. दररोज थोडे पाणी द्या. तीन ते चार दिवसात दाण्यांची कोंब फुटून हिरवी मोड दिसायला लागतात. आठवडाभरात मेथीची कोवळी रोपे भरभरून उगवतात. १२–१५ दिवसांत हिरवीगार पाने कापून वापरता येतात.
ताजी, घरची मेथी चवीला तर अप्रतिमच असते, शिवाय रासायनिक खतांशिवाय तयार झाल्याने पूर्णपणे निरोगीही असते. दर १५ दिवसांनी नवी पेरणी केली तर तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच ताजी मेथी उपलब्ध राहू शकते.
