Join us

घरीच छोट्या कुंडीत लावा १०० रूपयाला १ मिळणारं ड्रॅगन फ्रुट, लाखोंचा होईल फायदा- वर्षानुवर्ष खाल फळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:55 IST

How To Grow Dragon Fruit At Home :

गार्डनिंग (Gardening Tips) करायला ज्यांना आवडतं ते लोक घरबसल्या आपली कमाई वाढवू शकतात. घरात टॅरेसवर किंवा छोट्याश्या जागेत ड्रॅगन फ्रुट  लावू शकतात.  छोट्यात छोट्या कुंडीत  हे रोप तुम्ही लावू शकता. ड्रॅगन फ्रुटचे हे रोप २० वर्ष चांगले राहते. १४ प्रकारचे ड्रॅगन फ्रुट तुम्ही कुंडीत उगवू शकता. ही रोपं लावणं एकदम सोपं आहे. ड्रॅगन फ्रुट लावण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कुंडी लागेल. यात माती, थोडं कोकोपीट, व्हाईट ड्रॅगन फ्रुटची कटिंग लागेल.  नंतर  ड्रॅगन फ्रुटची कटिंग लावा. (How To Grow Dragon Fruit At Home)

कटिंग लावल्यानंतर यात पाणी घाला जवळपास १५ दिवस असंच सोडा. जेव्हा माती पूर्णपणे सुकेल तेव्हा पाणी द्या. या रोपाला सतत पाणी देण्याची गरज नाही. १५ दिवसांतच चांगली वाढ दिसून येईल. जर तुम्ही आधी छोट्या कुंडीत हे लोक लावणार असाल तर नंतर अशा भांड्यात शिफ्ट करा ज्यात १० किलो माती तुम्ही भरू शकता.(How To Grow Dragon Fruit In Your Own Kitchen)

नंतर लोखंडाचा रॉड किंवा लाकूड लावा. ज्याच्या आधाराने ड्रॅगन फ्रुटचं रोप व्यवस्थित वरच्या दिशेनं वाढेल आणि त्याच्या फांद्याही काढता येतील.त्यानंतर १० दिवसांत एकदा पाणी देत राहा. जर तुम्ही ऑर्गेनिक खत देत असाल तर  रोपाला गरज असेल तेव्हाच द्या. वर्षातून एकदा हलक्या फुलक्या रासायनिक खतांचा वापर करू शकता.

गुलाबाचं रोप टराटरा वाढलं पण फुलांचा पत्ता नाही? मातीत ‘हे’ घरगुती खत मिसळा, फुलांनी बहरेल झाड

योग्य कुंडी आणि मातीची निवड

ड्रॅगन फ्रुटचं रोप लावण्यासाठी साधारणपणे २० ते २४ इंच व्यासाची आणि १२ ते १५ इंच उंचीची कुंडी निवडा. या रोपाला पाण्याचा चांगला निचरा होणारी माती लागते. त्यासाठी ४०% सामान्य बागेतील माती, ३०% वाळू आणि ३०% शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळा. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि रोपांची वाढ चांगली होते.

छोट्याश्या बॉटलमध्ये लावा मनी प्लांट; ३ स्टेप्स, भरगच्च पानांनी बहरेल पाण्यातला मनी प्लांट

पाणी योग्य प्रमाणात घाला

ड्रॅगन फ्रुट हे कमी पाण्यावर वाढणारं रोप आहे. त्यामुळे त्याला जास्त पाणी देऊ नका. कुंडीतील माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळं कुजण्याची शक्यता असते. पावसाळ्यात कुंडीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

खत वेळोवेळी द्या

या रोपाला योग्य वाढीसाठी आणि चांगल्या फळांसाठी वेळोवेळी खत द्या. सुरुवातीच्या काळात महिन्यातून एकदा सेंद्रिय खत जसे की, शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या. रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळायला हवा. दिवसातून किमान ६ ते ८ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा. साधारणपणे रोप लावल्यापासून १ ते २ वर्षांनी या रोपाला फळं यायला सुरुवात होते. फुलं उमलल्यानंतर ४० ते ५० दिवसांत फळं तयार होतात. फळं लाल किंवा गुलाबी झाल्यावर ती काढण्यासाठी तयार होतात.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स