Join us

कुंडीतला कडिपत्ता सारखा सुकून जातो? ३ टिप्स- जोमात वाढून हिरवागार- भरगच्च होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 09:15 IST

Gardening Tips For The Growth Of Curry Leaves Plant: कुंडीतल्या कडिपत्त्याची पाहिजे तशी वाढ होत नसेल तर हे काही उपाय करून पाहू शकता...(best fertilizer for curry leaves plant)

ठळक मुद्देकुंडीतलं कडिपत्त्याचं रोप खूप छान वाढावं म्हणून नेमकं काय करायचं?

कडिपत्ता आपल्या स्वयंपाकात नेहमीच असतो. एखाद्या पदार्थाला जेव्हा कडिपत्त्याची मस्त खमंग फोडणी लागते तेव्हा त्या पदार्थाची चव आणि सुगंध दोन्हीही खुलून येतात. सांबार, चटणी हे पदार्थ करताना तर कडिपत्ता हमखास पाहिजेच. बरं हा कडिपत्ता फक्त स्वयंपाकातच उपयुक्त ठरतो असं नाही. तर केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठीही कडिपत्त्याची खूप मदत होते. त्यामुळे अगदी हौशीने आपण कडिपत्त्याचे रोप कुंडीमध्ये लावतो. पण ते चांगलं वाढतच नाही (best fertilizer for curry leaves plant). म्हणूनच आता कुंडीतलं कडिपत्त्याचं रोप खूप छान वाढावं म्हणून नेमकं काय करायचं ते पाहूया...(Gardening Tips For The Growth Of Curry Leaves Plant) 

कडिपत्त्याच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी काय उपाय करावे?

 

कडिपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली व्हावी यासाठी त्याचं हार्ड प्रुनिंग म्हणजेच त्याची छाटणी करणे गरजेचे आहे. छाटणी केल्यानंतर त्याला जास्तीत जास्त फांद्या येतात आणि रोप बहरून येण्यास मदत होते. 

डॉक्टर सांगतात फक्त १५ दिवसांत घटेल पोटावरची चरबी- ३ पदार्थ घेऊन करा खास उपाय

छाटणी केल्यानंतर हे झाड खूप जास्त कडक उन्हात ठेवू नका. कारण सध्या उन्हाळा तीव्र झाल्याने तो छाटणी केलेल्या नाजूक भागाला सहन होणार नाही. त्यामुळे दिवसातले ३ ते ४ तास त्याला सूर्यप्रकाश मिळेल अशाच पद्धतीने त्याची जागा असावी.

 

कडिपत्त्यासाठी खूप काही वेगळं खत घालण्याची गरज नाही. आपण स्वयंपाक घरात तयार होणारं आंबट ताक हे त्याच्यासाठी उत्तम खत आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा कडिपत्त्याच्या झाडाला अगदी पातळ केलेलं ताक जरूर घाला. 

डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागलात? ही ४९ रुपयांची वस्तू आणा- कोंडा कायमचा निघून जाईल

कडिपत्त्याच्या रोपाला खूप जास्त पाणी घालू नका. कुंडीतली माती ओलसर राहील एवढं पाणी त्याला पुरेसं असतं. 

हे काही उपाय जर नियमितपणे केले तर नक्कीच कडिपत्त्याच्या रोपाची खूप चांगली वाढ होईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी